द काश्मीर फाइल्स सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्या इजरायली परीक्षकाला इजरायलच्याच राजदूताने झापले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : द काश्मीर फाइल्स निव्वळ प्रपोगंडा आहे. तो सिनेमा गोव्यातील इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवात सामील कसा काय झाला?, याचे मला आश्चर्य वाटते आणि खेद वाटतो अशा शब्दात चित्रपट महोत्सवाचे मुख्य परीक्षक इजराइलचे नवाद लॅपीड यांनी शरसंधान साधले होते. पण त्यांना त्यांच्याच देशाचे राजदूत नाओर गिलोन यांनी खुले पत्र लिहून झापून काढले आहे. The Israeli ambassador slammed the Israeli reviewer for calling The Kashmir Files movie propaganda

इजरायल मध्ये तुम्हाला काय आवडत नाही ते बोलायला तुम्ही मोकळे आहात. पण तुमचे स्वतःच्या देशात असलेले फ्रस्ट्रेशन इतर देशांमध्ये येऊन काढण्याचे काही कारण नाही, अशा शब्दांत इजरायली राजदूत नाओर गिलोन यांनी नवाज लॅपीड यांना ठणकावले आहे.

द काश्मीर फाइल्स हा सिनेमा काश्मीरमधील हिंदूंचे दुःख मांडतो. 1990 च्या दशकात हिंदूंचे जे शिरकाण झाले, त्याचे सत्य दाखवतो. हा सिनेमा इफ्फी महोत्सवात दाखविण्यात आला होता. याच मुद्द्यावरून नवाद लॅपीड यांनी इफ्फी मोत्सवाच्या समारोप समारंभात हा सिनेमा प्रोपोगंडा फिल्म असल्याची टीका केली होती. त्यानंतर सर्व लिबरल गॅंगने लॅपीड यांचे म्हणणे उचलून धरून सिनेमाचा दिग्दर्शक आणि स्टार कास्ट यांच्या दिशेने वाग्बाण सोडले होते. पण या मुद्द्यावर आता इजरायली राजदूताने खुले पत्र लिहून लॅपीड यांनी आपल्या देशातले फ्रस्ट्रेशन इतर देशांमध्ये येऊन काढू नये, असे झापले.

या सिनेमातील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेते अनुपम खेर यांनी देखील लॅपीड यांच्यावर टीका केली असून द काश्मीर फाईल्सला प्रपोगंडा फिल्म म्हणण्यामागे काही आंतरराष्ट्रीय साजिश असल्याचे म्हटले आहे. कारण लॅपीड यांच्या वक्तव्यानंतर ताबडतोब टूलकिट गँग जागी झाली आणि त्यांनी द काश्मीर फाईल्स वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले.

ज्या इजरायलने ज्यूंचे प्रचंड मोठे शिरकाण पाहिले, त्या देशातल्या एका ज्येष्ठ परीक्षकाला द काश्मीर फाइल्स मधले हिंदूंच्या शिरकाणाचे याचे सत्य टोचावे. त्याला ती फिल्म प्रपोगंडा वाटावी, याचेच आपल्याला आश्चर्य वाटते, असा टोलाही अनुपम खेर यांनी लगावला आहे.

The Israeli ambassador slammed the Israeli reviewer for calling The Kashmir Files movie propaganda

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण