Umar Abdullah : मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अंगावर पडताच उमर अब्दुल्लांच्या सुरवातीच्या निवेदनातून 370 ची बात गायब!!

Umar Abdullah

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकीतल्या प्रचारात राणा भीमदेवी थाटात 370 कलम पुन्हा लागू करण्याच्या गर्जना अब्दुल्ला परिवाराच्या नॅशनल कॉन्फरन्सने जरूर केल्या. लोकांना भुलविले. पण प्रत्यक्षात निवडणुकीत यश मिळवून सत्तेची जबाबदारी सांभाळायची वेळ येताच नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचे तेवर बदलले. त्यांची बॉबी लँग्वेज बदलली. त्यांच्या निवेदनातून 370 कलमाचा मुद्दाच गायब झाला. Umar Abdullah not said 370

जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस बरोबर युती करून नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूक जिंकली त्यानंतर फारूक अब्दुल्लांनी ताबडतोब उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील असे परस्पर जाहीर करून टाकले. त्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वेगवेगळ्या निवेदनांमधून 370 चा मुद्दा गायब झाल्याचे पाहायला मिळाले.


हरियाणातील विजयानंतर पीएम मोदींचे कार्यकर्त्यांना भाजप संबोधन; काँग्रेसचे जातीजातीत विष पसरवतेय, म्हणूनच त्यांचा पराभव


भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात राजकीय संघर्ष कायम राहील, पण केंद्र सरकारशी जम्मू काश्मीर सरकारचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. केंद्र सरकारशी झगडा करण्यात काही मतलबच नाही. कारण जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी झगडा करण्यासाठी नाही, तर राज्याच्या कल्याणासाठी मतदान केले आहे. राज्याच्या कल्याणासाठीच केंद्र सरकारशी चांगले संबंध ठेवून काम करत राहू. राज्यातल्या विविध समस्या सोडवू, असे निवेदन उमर अब्दुल्लांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिले. त्यांच्या निवेदनातून 370 कलम परत आणायचा मुद्दा गायब झाला होता.

राज्यातल्या निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान मात्र काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी त्याचबरोबर इतरही प्रादेशिक पक्षांनी 370 कलमाचा मुद्दा लावून धरला होता. भाजपने मात्र 370 कलम पुन्हा लागू होणार नाही असे ठामपणे सांगून लोकांकडे मते मागितली होती. त्यांचे जम्मू काश्मीरमधल्या जनतेने 29 आमदार निवडून दिले.

Umar Abdullah not said 370

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात