डोळ्यातून अश्रू तरळले आणि म्हणाल्या…
विशेष प्रतिनिधी
राम मंदिर आंदोलनात मोठी भूमिकाअसलेल्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी भावूक झाल्याचे दिसून आले. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचलेल्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी एकमेकांना मिठी मारली आणि यादरम्यान साध्वी ऋतंभरा यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. यावेळी त्या म्हणाले की, आज शब्द नाहीत… भावना सर्व काही सांगत आहेत.Uma Bharti and Sadhvi Ritambhara emotional at Ramlallas Abhishek ceremony
परम शक्तीपीठ आणि वात्सल्यग्रामच्या संस्थापिका साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, “प्राण प्रतिष्ठेचा हा आनंदाचा क्षण आहे, संपूर्ण देश आणि संपूर्ण जग सजले आहे… कारसेवकांचे बलिदान सार्थक झाले आहे… राम लल्ला आले आहेत.”
आयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 100 कोटी हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरले. साडेपाचशे वर्षांचा कडवा संघर्ष खऱ्या अर्थाने कामी आला. शेकडो कार्य सेवकांच्या हौतात्म्याचे चीज झाले. लाखो कारसेवकांचे कष्ट फळाला आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांचे वैदिक मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह 11 यजमान दांपत्ये उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App