विशेष प्रतिनिधी
सातारा : काँग्रेस हायकमांडला आव्हान ठरणाऱ्या बड्या नेत्यांना “गायब” करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, असा गंभीर आरोप सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवारी उदयनराजे भोसले यांनी उदाहरणांसकट केला. राजेश पायलट, वायएसआर राजशेखर रेड्डी, माधवराव शिंदे यांच्या मृत्यूबाबत उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे शंका व्यक्त केली. ते साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. Udayan raje targets Congress over suspicious deaths of challenging leaders
उदयनराजे म्हणाले, राजेश पायलट यांचा मृत्यू रस्त्यावरील अपघातात झाला होता, तर वायएसआर राजशेखर रेड्डी आणि माधवराव शिंदे यांचा मृत्यू हा हेलिकॉप्टर अपघातात झाला होता. हे सगळे मृत्यू संशयास्पद आहेत काँग्रेस हायकमांडला आव्हान ठरणाऱ्या बड्या नेत्यांना “गायब” करण्याची काँग्रेसमध्ये परंपराच आहे. उदयनराजेंच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उदयनराजे म्हणाले
काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट हे विचारांनी चांगले होते. ते अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरायला निघाले होते. त्यांचा अपघात झाला. माधवराव शिंदे यांचाही अपघात झाला. वायएसआर रेड्डी फार प्रसिद्ध होते. त्यांचाही अपघातच झाला.
बाळासाहेब थोरातांचे प्रत्युत्तर
तर उदयनराजे यांच्या याच विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. थोरात म्हणाले. “खरं म्हणजे उदयनराजे यांनी काहीही बोलावे आणि आम्ही त्याला उत्तर द्यावे, असे नाही. पण त्यांनी केलेले विधान हे तर्कहीन आहे,” असे उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App