Vietnam : व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळामुळे199 ठार; पूर आणि भूस्खलनात 128 लोक बेपत्ता, शहरे जलमय

Vietnam

वृत्तसंस्था

हनोई : यागी चक्रीवादळामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे व्हिएतनाममध्ये ( Vietnam )  199 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएतनामी वृत्तपत्र व्हीएन एक्सप्रेसनुसार, 128 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर 800 हून अधिक जखमी झाले आहेत.

रेड नदीला पूर आल्याने राजधानी हनोई जलमय झाले. सध्या पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक भागात अजूनही पाणी तुंबले आहे. पाणी साचल्यामुळे हनोईतील फाप वान-कौ गी एक्सप्रेसवेचा काही भाग पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.



पुरामुळे हजारो लोक बाधित, शेतकऱ्यांचे जास्त नुकसान

स्थानिक मीडियानुसार, व्हिएतनाममधील लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. व्हिएतनामच्या कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 25 हजार हेक्टरमधील पिके नष्ट झाली आहेत.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत सुमारे 15 लाख कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2500 हून अधिक डुकरे, म्हशी आणि गायींचाही मृत्यू झाला आहे.

भूस्खलनात संपूर्ण गाव गाडले गेले

10 सप्टेंबर रोजी लाओ काई प्रांतात भूस्खलनामुळे लांग नू गाव मातीखाली गाडले गेले. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 500 मीटर अंतरावरील डोंगरावरून चिखल आणि खडक वाहून गेले आणि संपूर्ण गाव चिखलात गाडले. या गावात 37 घरे होती, ज्यामध्ये 158 लोक राहत होते.

दरड कोसळल्यानंतर 17 जखमींना रुग्णालयात नेण्यात स्थानिकांना यश आले. व्हीएन एक्सप्रेसनुसार, आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 53 लोक अजूनही बेपत्ता आहेत. जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर असल्याने आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प असल्याने दुपारी 2 वाजेपर्यंत बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकले नाही.

दक्षिण चीन समुद्रातून निर्माण झालेले यागी वादळ 3 सप्टेंबर रोजी व्हिएतनामच्या दिशेने सरकले. 2 दिवसांनंतर, त्याचे सुपर वादळात रूपांतर झाले, ज्यामुळे 201 किमी/तास वेगाने वारे वाहू लागले. 8 सप्टेंबर रोजी यागी चक्रीवादळ व्हिएतनामच्या उत्तर किनाऱ्यावर धडकले. किनारपट्टीवर आदळल्यानंतर वाऱ्याचा वेग 149 किमी/ताशी थोडा कमी झाला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यागी चक्रीवादळ हे आशियातील या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ आहे. इतके शक्तिशाली वादळ तीन दशकांनंतर व्हिएतनामला धडकले आहे.

Typhoon Yagi kills 199 in Vietnam; 128 people missing in floods

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात