दुबईला पळून जाण्याच्या होते प्रयत्नात
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Malegaon ईडी मालेगाव कथित वोट जिहाद आणि सुमारे 1000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शरीफमिया अमीरमिया शेख आणि मोहसिन अहमद मुस्ताकली खिलजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा सूत्रधार मोहम्मद भागड उर्फ एमडी याचे जवळचे सहकारी असल्याचा आरोप आहे.Malegaon
एजन्सीच्या तपासापासून वाचण्यासाठी दोन्ही आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होते आणि दोघेही अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना ईडीने अटक केल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोन्ही आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आणि जेव्हा हे लोक विमानतळावर पोहोचले, तेव्हा एजन्सींना अलर्ट मिळाला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान, हे दोन्ही आरोपी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीच्या थेट संपर्कात होते आणि मनी लाँड्रिंगमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही आरोपींना पीएमएलए, 2002 च्या कलम 19 अन्वये अटक करून मुंबई पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची ईडी कोठडीत रवानगी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App