America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी

America

रिपोर्टनुसार गोळीबारात सहभागी दोन संशयित अद्याप फरार आहेत.


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर आता आणखी एक हल्ला झाला आहे. यावेळी एका हल्लेखोराने न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये 11 जणांवर गोळ्या झाडल्या आहेत. amny.com च्या रिपोर्टनुसार, क्वीन्समधील अमेझुरा नाईट क्लबमध्ये शूटिंग झाले. 1 जानेवारी रोजी रात्री 11.45 च्या सुमारास अमझुरा इव्हेंट हॉलजवळ गोळीबार झाला.America

गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर, NYPD युनिट इव्हेंट हॉलजवळ जमले आहे आणि घटनास्थळाची तपासणी करत आहे. सिटीझन ॲपच्या रिपोर्टनुसार गोळीबारात सहभागी दोन संशयित अद्याप फरार आहेत.



अमेजुरा इव्हेंट हॉल जमैका लाँग आयलँड रेल रोड स्टेशनपासून काही ब्लॉक्सवर आहे. जिथे रात्री 11.45 च्या सुमारास बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येऊ लागले, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान काही जणांना गंभीर दुखापतही झाली. परिस्थिती हाताळण्यासाठी न्यूयॉर्क पोलिस विभाग (NYPD) तात्काळ घटनास्थळी पोहोचला आणि SWAT टीम देखील तैनात केल्या. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूचे रस्ते बंद केले. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप एकाही संशयिताची ओळख पटलेली नाही.

पोलीस घरात जाऊन शोध घेत आहेत

न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभाग (FDNY) आणि इतर स्थानिक एजन्सींची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पीडितांना मदत करत आहेत. याशिवाय पोलीस जवळपासच्या घरांची झडती घेत आहेत आणि घटनेची अधिक माहिती गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Another major attack in America Shooting at New York nightclub, 11 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात