वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून दहशतवाद पुरता उखडून टाकण्यासाठी भारतीय सैन्य दलाने आखलेल्या मोहिमेत एक मोठे यश आले असून भारतीय सैन्य दलाने जून महिन्यातच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दोन नवे सर्जिकल स्ट्राइक केल्याची बातमी आली आहे. या सर्जिकल स्ट्राइक मध्ये भारतीय सैन्याने 15 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे. इतकेच नाही, तर 55 किलो ड्रग्स आणि शस्त्रे भारतीय सैन्यदलाने जप्त केली.Two new surgical strikes in Pakistan-occupied Kashmir; 15 terrorists killed!!; 55 kg of drugs seized
16 आणि 24 जून 2023 या दोन दिवसांमध्ये भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी पाक व्याप्त काश्मीर मध्ये प्रवेश करून तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनमध्ये 15 दहशतवादी मारले गेले.
याच दरम्यान दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून 15 वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले. पण भारतीय सैन्य दलाने तो प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. त्याचवेळी 16 आणि 24 जून या दोन दिवसांमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैनिकांच्या तुकडीने तिथले दहशतवादी तळ उध्वस्त केले. या कारवाईत 15 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
भारतात दहशतवाद्यांनी पुलवामात भारतीय सैन्य दलावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पहिला सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येच केला होता. त्यानंतर एक एअर स्ट्राइक देखील केला होता. पण या दोन्ही सर्जिकल स्ट्राइकला 5 वर्षे उलटून गेली. त्यानंतर 2023 मध्ये 16 आणि 24 जून या दोन दिवशी भारतीय सैन्य दराने पुन्हा एकदा पाकिस्तान व्यक्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून तिथले दहशतवादी तळ उध्वस्त केले आणि 15 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App