विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजप नेते आमदार नितेश राणेंविरुद्ध ( ‘Nitesh Rane ) सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्याप्रकरणी दोन गटांविरुद्ध खडकी आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खडकी पोलिसांकडून आसनीन माजिद कुरेशी (२०) आफान रियाज चौधरी (२१), कामरान इसाक अन्सारी (१९), आरसलान महरुफ चौधरीविरुद्ध (२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाम नंदाराम काची यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मौलाना आझाद फाऊंडेशनकडून खडकी बाजार परिसरात मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी ‘गुस्ताक ए रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’च्या नितेश राणेंविषयी आक्षेपार्ह घोषणा, तसेच शिव्या देण्यात आल्या. पॅलेस्टाइन झिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या
स्वारगेट पोलिस ठाण्यात १०० ते १२५ जणांवर गु्न्हा दाखल
बेकायदेशीर जमाव जमवून धार्मिक तेढ निर्माण करणारी घोषणा दिल्याबद्दल स्वारगेट पोलिस ठाण्यात अक्षय सोनवणे, राहुल खुडे, हेमंत गायकवाड, मंगेश पवार, अक्षय ढावरे, बापू खुडे, उज्ज्वला गौड, गणेश शेरलांसह १०० ते १२५ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत कासेवाडी भागात एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यावरून २० सप्टेंबर राेजी स्वारगेट पोलिस ठाण्यात जमाव आला होता. केली, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारेंनी फिर्यादीत म्हटले आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App