BJP candidate Gobardhan Das Attacked : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर तेथे पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तसेच उमेदवारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. निवडणूक निकालाच्या 24 तासांतच 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. आता तर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व उत्तर पुरबस्थलीतील भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्यावर तृणमूलच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे. Trinamool goons Violence in Bengal, BJP candidate Gobardhan Das Attacked, forced to stay at home with his family, Central Home Minister sends CRPF To Rescue
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर तेथे पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तसेच उमेदवारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. निवडणूक निकालाच्या 24 तासांतच 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. आता तर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व उत्तर पुरबस्थलीतील भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्यावर तृणमूलच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला आहे.
गोवर्धन दास हे उत्तर पुरबस्थलीतून भाजप उमेदवार होते. त्यांच्या घराला सध्या तृणमूलच्या गुंडांनी घेरलेले असून बचावासाठी त्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठांसह स्वत:ला कोंडून घेतलेले आहे. तृणमूल गुंडांकडून त्यांच्या घरावर गावठी बॉम्बचा हल्ला करण्यात आला आहे. याबाबत आनंद रंगनाथन यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाही मदत पाठवण्याची विनंती केली आहे.
https://twitter.com/ARanganathan72/status/1389448810426888194?s=20
थोड्या वेळानेच रंगनाथन यांनी पुन्हा ट्वीट केले की, केंद्रीय गृहमंत्रालयाने आश्वस्त केले आहे की, सीआरपीएफची एक तुकडी प्राध्यापक गोवर्धन दास यांच्या गावी पाठवण्यात आली असून प्रत्यक्ष त्यांच्याशीही याविषयी बोलणे झाले आहे.
Trinamool goons Violence in Bengal, BJP candidate Gobardhan Das Attacked, forced to stay at home with his family, Central Home Minister sends CRPF To Rescue
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App