पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. रविवारी सकाळी 9.45 वाजता कोरोनाने त्यांचा बळी घेतला. Trinamool Congress candidate Kajal Sinha dies by corona
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील खडदह विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. रविवारी सकाळी 9.45 वाजता कोरोनाने त्यांचा बळी घेतला.
22 एप्रिलला कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काजल सिन्हा यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे. काजल सिन्हा यांनी पक्षासाठी झोकून देऊन कामं केलं. त्यांनी लोकांच्या सेवेसाठी अविरत काम केलं होतं, आम्हाला त्यांची कमी जाणवेल. तृणमूल काँग्रेस त्यांच्या परिवारासोबत आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत उमेदवार असलेल्या चौघांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. सहा उमेदवार कोरोनाग्रस्त आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज मतदारसंघातील कांग्रेसचे उमेदवार रेजाउल हक, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीकडून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपुरा विधानसभा मतदारसंघातून लढत असलेले प्रदीप कुमार नंदी, बीरभूम जिल्ह्यातील मुरारइ मतदारसंघातील अब्दुर रहमान यांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 14 हजार 281 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 28 हजार 61 वर पोहोचली आहे. तर, सध्या राज्यामध्ये 81 हजार 375 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या 10 हजार 884 वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App