तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांना लखीमपुरला जाऊ दिले; काँग्रेस विषयी भेदभाव केला!!; दीपेन्द्र हुडा यांचा आरोप

वृत्तसंस्था

सीतापुर : तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेत्यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने लखीमपुरला जाऊ दिले, पण काँग्रेस नेत्यांविषयी भेदभाव केला, असा आरोप काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा यांनी केला आहे.rinamool Congress and Rashtriya Lok Dal leaders allowed to go to Lakhimpur; Discriminated about Congress !!; Allegation of Dipendra Hooda

काँग्रेस मधून तृणमूल काँग्रेस मध्ये गेलेल्या आसाम मधल्या नेत्या सुष्मिता देव यांना भाजप सरकारने लखीमपुर गावाला जाऊ दिले. त्या तिथे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या. तिथले फोटो त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर शेअर केले. पण काँग्रेस नेत्यांना विशेषत: प्रियंका गांधींना मात्र भाजप सरकारने लखीमपुरला जाऊ दिले नाही.



आमचा हक्क डावलला, असा आरोप दीपेंद्र हुडा यांनी केला आहे. लोकशाहीत आम्हालाही देशात करण्याचा हक्क आहे. जनतेची दुःख जाणून घेण्याचा हक्क आहे. परंतु आम्हाला काल पासून सीतापुरच्या सरकारी डाक बंगल्यात स्थानबद्ध करून ठेवले आहेत.

आमच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे आम्हाला बातम्यांमधून समजले. प्रत्यक्ष सरकारने काहीही कळवलेले नाही. ही बाब कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे. आम्ही न्यायालयात याच्या विरोधात दाद मागू, असे दीपेन्द्र हुडा यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांच्या समवेत लखीमपुरला जायला निघाले होते. परंतु, त्यांना वाटेत अडवून सीतापूरच्या डाक बंगल्यात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे.

trinamool Congress and Rashtriya Lok Dal leaders allowed to go to Lakhimpur; Discriminated about Congress !!; Allegation of Dipendra Hooda

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात