Tomato Price : आठवडाभरातच टोमॅटोचा भाव २०० रुपये किलोवरून थेट १४ रुपये किलोपर्यंत घसरला!

जाणून घ्या टोमॅटोच्या भावात का आली मोठी घट

विशेष प्रतिनिधी

इंदुर : काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा भाव देशात 200 रुपये किलोवर पोहोचला होता. देशातील बहुतांश ठिकाणी टोमॅटो 180 ते 200 रुपये किलोने विकले जात होते. मात्र, आठवडाभरात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर 200 रुपये किलोवरून 14 रुपये किलोवर आले आहेत. Tomato Price Within a week the price of tomatoes dropped from Rs 200 per kg to Rs 14 per kg

टोमॅटोच्या दरात एवढी मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हैसूरमध्ये टोमॅटोचा भाव शनिवारी 20 रुपये होता आणि रविवारी तो 14 रुपये किलोवर आला. रविवारी बंगळुरूच्या बाजारात टोमॅटोचा किरकोळ भाव ३० ते ३५ रुपये किलो होता. आगामी काळात टोमॅटोचे भाव आणखी खाली येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव 5 ते 11 रुपये किलोपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. म्हैसूर एपीएमसीचे सचिव कुमारस्वामी सांगतात की टोमॅटोच्या पुरवठ्याने किंमत कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

देशभरात टोमॅटोच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने  बाजारात टोमॅटोची मागणी घटली होती.  यानंतर सरकारने  नेपाळमधून मोठ्याप्रमाणावर टोमॅटोची आयात केल्याने टोमॅटोचे भाव घसरले आहेत. याशिवाय बंगळुरू आणि इतर भागातून टोमॅटोचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आणि टोमॅटोचे भाव कमी करण्यात सरकारने मोठी भूमिका बजावली आहे. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सरकार कमी दराने टोमॅटो विकत आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.

Tomato Price Within a week the price of tomatoes dropped from Rs 200 per kg to Rs 14 per kg

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात