Tokyo Paralympics : पदक जिंकणाऱ्या प्रमोद भगत आणि मनोज यांना पीएम मोदींचा फोन, अभिनंदन करत म्हणाले, ‘तुम्ही संपूर्ण देशाचे मन जिंकले!’

Tokyo Paralympics PM Modi congratulates Pramod Bhagat and Manoj Sarkar on winning medals

Tokyo Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत आणि मनोज सरकारचे फोनवर अभिनंदन केले. भारतीय क्रीडापटू विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची भावना उल्लेखनीय आहे याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. Tokyo Paralympics PM Modi congratulates Pramod Bhagat and Manoj Sarkar on winning medals


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत आणि मनोज सरकारचे फोनवर अभिनंदन केले. भारतीय क्रीडापटू विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची भावना उल्लेखनीय आहे याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या दोघांनाही याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, जगात प्रथम क्रमांकावर असलेला भारताचा बॅडमिंटन स्टार प्रमोद भगतने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. व्यासपीठावर राष्ट्रगीत वाजले असल्याने भारतीयांसाठी ही विशेष आनंदाची बाब आहे. बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

सुवर्ण कामगिरी करणारा प्रमोद पहिला भारतीय शटलर

यासह भारताच्या मनोज सरकारलाही कांस्य पदक मिळाले. प्रमोद भगतने शनिवारी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या एसएल 3 फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव केला. यासह, 33 वर्षीय प्रमोद सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पॅरालिम्पिक शटलर बनला आहे.

मनोजने जिंकले कांस्य

एसएल 3 प्रकारातच मनोज सरकारनेही चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. उत्तराखंडचा असलेल्या मनोजने कांस्य पदकाच्या लढतीत जपानच्या डेसुके फुजीहाराला 46 मिनिटांमध्ये 22-20, 21-13 ने पराभूत केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मनोज सरकारचा उपांत्य फेरीत डॅनियल बेथेलने पराभव केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला 17 पदके मिळाली आहेत आणि ही यादी आणखी पुढे जाईल. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

प्रमोद आणखी एक पदक जिंकण्याची शक्यता

प्रमोद भगत सध्या मिश्र दुहेरी SL3-SU5 वर्गात कांस्य पदकाच्या शर्यतीत आहे. भगत आणि त्याचा साथीदार पलक कोहली रविवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांच्याशी लढतील.

वयाच्या 5 व्या वर्षी पोलिओमुळे त्याचा डावा पाय दिव्यांग झाला होता. त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चार सुवर्णांसह 45 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने गेल्या आठ वर्षांत दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकले आहेत. 2018 पॅरा एशियन गेम्समध्ये त्याने एक सुवर्ण आणि एक कांस्य जिंकले.

IAS सुहास आणि कृष्णाकडूनही गोल्डची आशा

बॅडमिंटनमध्ये आयएएस सुहास यथिराज आणि कृष्णा नगर या भारतीय खेळाडूंनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एसएल 4 वर्गात, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुहास यांनी उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानचा 31 मिनिटांत 21-9, 21-15 असा पराभव केला. आता रविवारी नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास यांचा सामना अंतिम फेरीत फ्रान्सच्या लुकासशी होईल.

Tokyo Paralympics PM Modi congratulates Pramod Bhagat and Manoj Sarkar on winning medals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात