Tokyo Paralympics 2020 : पॅरालिम्पिक टेबल टेनिस फायनलमध्ये भाविना पटेल, गोल्डपासून अवघी एक पाऊल दूर

वृत्तसंस्था

टोकियो : भाविना पटेल पॅरालिम्पिक टेबल टेनिसची अंतिम फेरी गाठणारी भारताची खेळाडू बनली आहे. तिने शनिवारी टोकियो क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी वर्ग 4 च्या उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव केला. आता ती सुवर्णपदक जिंकून इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. Tokyo Paralympics 2020 Bhavina Patel of India creates history reaches final of class 4 Table Tennis

या खेळांमध्ये सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी वचनबद्ध भारतीय तुकडीसाठी ही चांगली सुरुवात आहे. विजयानंतर 34 वर्षीय भाविना म्हणाली, ‘मी उपांत्य फेरीत चीनच्या खेळाडूला पराभूत केले आहे. इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही.’

गुजरातच्या मेहसाणा येथील भाविना पटेल आता 29 ऑगस्टला जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करेल, जिथे तिचा सामना चीनच्या झोउ यिंगशी होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.15 वाजता सुरू होईल.

शुक्रवारी पॅरालिम्पिक उपांत्य फेरी गाठणारी ती भारताची पहिली टेबल टेनिसपटू ठरली. तिने उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रॅन्कोवीचा 11-5, 11-6, 11-7 असा पराभव करत टेबल टेनिसमध्ये भारतासाठी पदक पक्के केले.

शुक्रवारीच भाविनाने शेवटच्या 16 सामन्यात ब्राझीलच्या जॉइस डी ऑलिव्हिराला 12-10, 13-11, 11-6 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पॅरालिम्पिक उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती भारताची पहिली टेबल टेनिसपटू ठरली.

Tokyo Paralympics 2020 Bhavina Patel of India creates history reaches final of class 4 Table Tennis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात