५-२ च्या फरकाने भारताने सामना गमावला, आता कांस्यपदाकासाठी सामना
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे लागल्या होत्या. सेमी फायनल जिंकून मेडल पक्कं करा, अशी अपेक्षा देशवासिय भारतीय हॉकी संघाकडून करत असतांना पुन्हा एक स्वर्ण स्वप्न भंगले आहे. Tokyo Olympics: Another golden dream shattered; India’s defeat to Belgium in the semi-finals; 5-2 victory over Belgium; Now Laksh Bronze …
उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जिअमने भारतावर ५-२ च्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारताकडे २-१ अशी आघाडी होती. परंतू यानंतर बेल्जिअमने आपल्या आक्रमणाची धार वाढवत भारताला बॅकफूटला ढकलत सामन्यात बाजी मारली. भारतीय हॉकी संघाला आता ब्राँझ मेडलसाठी खेळावं लागणार आहे.
बेल्जिअमने भारताचा पराभव केला. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. अखेर बेल्जिअमने भारताचा ५-२ असा पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली.
पहिल्या सत्रावर भारताने अनपेक्षितरित्या वर्चस्व गाजवल्यानंतर बेल्जिअमचा संघ थोडासा बॅकफूटला गेला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच बेल्जिअमने आक्रमणाची धार वाढवली. डाव्या बाजूला बचावफळीतील त्रुटीचा फायदा घेत बेल्जिअमने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले केले.
ज्यानंतर पेनल्टी कॉर्नरवर बेल्जिअमला लागोपाठ ३-४ संधी मिळाल्या. यापैकी एका संधीचं अलेक्झांडर हेंड्रीक्सने गोलमध्ये रुपांतर करत बेल्जिअमला २-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात सामन्याचं पारडं दोन्ही संघांच्या दिशेने झुकताना पहायला मिळालं. अखेरीस मध्यांतरापर्यंत सामना २-२ अशा बरोबरीत पहायला मिळाला.
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी काही सुरेख चाली रचत एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतू गोल करण्याचे त्यांचे प्रयत्न हो तोकडेच पडले. भारतीय बचावफळीने अखेरच्या काही मिनीटांमध्ये बेल्जिअमला वरचढ होण्याची संधी दिली नाही ज्यामुळे तिसरं सत्र विनागोल पहायला मिळालं.
चौथ्या सत्रात बेल्जिअमने सामन्याची सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. भारतीय गोलपोस्टवर सातत्याने आक्रमक सुरु ठेवत बेल्जिअमने भारताला कायम दबावाखाली ठेवलं. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात खेळाला सुरुवात झाल्यानंतर बेल्जिअमने ५-८ मिनीटांच्या अंतरात सातत्याने पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. यापैकी ४९ व्या मिनीटाला आणि ५३ व्या मिनीटाला गोल करत अलेक्झांडर हेंड्रिक्सने बेल्जिअमची आघाडी ४-२ अशी वाढवली. यानंतर भारतीय खेळाडूंची सामन्यातली लय बिघडलेली पहायला मिळाली. भारताच्या बचावफळीत शिथीलता आल्यामुळे बेल्जिअमने आक्रमणाची धार वाढवत आपले हल्ले सुरुच ठेवले. दुसरीकडे भारतीय खेळाडू बेल्जिअमवर प्रतिहल्ला करण्यात पूरते अपयशी ठरताना दिसले. अखेरच्या काही क्षणांमध्ये भारताने श्रीजेशला मैदानावरुन हटवत आक्रमणात आणखी एक माणूस वाढवला. परंतू बेल्जिअमने याचा फायदा उचलत आणखी एक गोल डागत भारताच्या उरल्या सुरल्या सर्व आशा संपुष्टात आणल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App