आसाम- मिझोराम सीमावाद भडकविण्याचा कॉँग्रेसचा कुटील डाव, परदेशी शक्तींकडूनही भडकाऊ वक्तव्ये, इशान्येतील खासदारांचे पंतप्रधानांना पत्र


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराममधील सीमावाद भडकाविण्याचा कुटील डाव कॉँग्रेसने आखला आहे. परदेशी शक्तीही परदेशी शक्ती दोन्ही राज्यांमधील परिस्थिती बिघडवण्यासाठी भडकवणारे वक्तव्य करत आहेत, अशी तक्रार ईशान्येकडील खासदारांनी केली आहे.Assam-Mizoram Congress’s insidious ploy to provoke borderism, provocative statements from foreign powers, letter from Northeast MPs to PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर करून दोन राज्यांमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबद्दल खासदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. या निवेदनावर केंद्रीय मंत्री सवार्नंद सोनोवाल, प्रतिमा भौमिक, दिलीप सैकिया, पल्लभ लोचन दास, तापिर गाओ, प्रधान बरुआ यांच्यासह इतर ईशान्येतील खासदारांनी स्वाक्षरी केली.



खासदारांनी सांगितले की, काँग्रेस पक्षासारख्या काही घटकांनी या संघर्षात राजकारण साधण्याचा कुटील डाव आखला आहे. त्याला रोखण्याची गरज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिल्यावर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू म्हणाले पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात आम्ही नमूद केले आहे की आसाम आणि मिझोराममधील सीमा प्रश्न जुना आहे.

दोन्ही राज्य सरकारे हा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने काम करत आहेत. पण काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष आगीत तेल ओतत आहे. ते प्रक्षोभक वक्तव्ये देत आहेत आणि लोकांना भडकवत आहेत. या प्रकरणात सोशल मीडियाद्वारे देशाबाहेरून हस्तक्षेप झाल्याचेही दिसून आले आहे. आम्ही याचा निषेध करतो.

पंतप्रधान मोदींना दिलेल्या निवेदनात खासदारांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना इशान्येतील संस्कृतीबद्दल बिलकुल आदर नाही. इशान्येकडील राज्यांतील अनेक परंपरांचा त्यांनी अपमान केला आहे. दुसऱ्या बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला. भारतीय स्वातंत्र्यांनंतर प्रथमच हे घडले आहे.

या विषयावर बोलताना आसाम भाजपा सरचिटणीस दिलीप सैकिया म्हणाले, “आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचारावर भावनात्मक वातावरण निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. ईशान्येकडील त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना तोडगा सापडला नाही. या समस्येसाठी पण आता ते आमच्यावर आरोप करत आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार ईशान्येकडील सर्व राज्यांशी चर्चा करून आंतरराज्य सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे. पंतप्रधान स्वत: यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की निश्चित कालमर्यादेत हा प्रश्न ते सोडवितील.

Assam-Mizoram Congress’s insidious ploy to provoke borderism, provocative statements from foreign powers, letter from Northeast MPs to PM

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात