हिंदू धर्मात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणूनच कारागिरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, भाजपाच्या खासदाराचा दावा


विशेष प्रतिनिधी

मुझफ्फरनगर: हिंदू धर्मात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणूनच कारागिरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. उत्तर प्रदेशातील मुस्लिम कारागिर हे मुळचे हिंदू होते. त्यांना हिंदू धर्मामध्ये मान मिळाला नाही म्हणूनच त्यांनी धर्मांतर केले असा दावा भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामचंद्र जांग्रा यांनी केला आहे.The BJP MP claims that the artisans converted to Islam because they did not get due respect in Hinduism

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तपासूनच धर्माधारित राजकारण सुरू आहे. याचाच एक भाग म्हणनू जांग्रा यांचे वक्तव्य पाहिले जात आहे. विश्वकर्मा समुदायासमोर बोलताना जांग्रा म्हणाले, या भागातील मुस्लिम कारागीर हे मूळचे हिंदू होते.



त्यांना हिंदू धर्मामध्ये योग्य मान्यता दिली जात नसल्याने त्यांनी धर्मांतर केले होते. माजी कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता कारण त्यांना हिंदू धर्मामध्ये योग्य आदर दिला जात नव्हता. केवळ हिंदू कारागीरच नाही तर मुस्लिम समुदायाचे कारागीर देखील ‘विश्वकर्मा’ समुदायाचे आहेत.

आपण इतिहासाचे विद्यार्थी आहोत आणि मुस्लिम कारागीरांनी इस्लाम का स्वीकारला आहे याची माहिती असल्याचे सांगताना जांग्रा म्हणाले, बाबराने आपल्यासोबत कारागीर आणले नाहीत. इराण आणि इराकच्या भूमीवर आणि सर्व आखाती देशांमध्ये फक्त गवत आहे. जमीनीवर वाळूचे ढिगारे आहेत.

त्या भूमीतून तेलाशिवाय कोणतेही खनिज बाहेर पडत नाही. त्यामुळे त्याठिकाणी कोणीही कारागीर असूच शकत नाही. त्यामुळे येथील सर्व मुस्लिम बांधव भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत. त्यांना धर्मांतर करायला काही कारण असावे. मला काही कारणे माहीत आहेत. मी इतिहास वाचला आहे.

अनेक गोष्टी आहेत ज्या सार्वजनिक मंचावरून सांगता येत नाहीत. पण इथे श्रमाला आदर मिळत नाही, मेहनतीला आदर मिळत नाही जर प्रयत्नांना आदर मिळाला नाही तर लोक प्रतिक्रिया म्हणून धर्म सोडून देतात.

महाभारतातील ओळी उद्धृत करताना जांग्रा म्हणाले, भीष्म पितामह म्हणाले की जेव्हा जेव्हा अन्याय, भेदभाव आणि अत्याचार होतात तेव्हा सर्वकाही सोडून कुरुक्षेत्राच्या मैदानात या. हे केवळ इस्लामी कारागीरांनीच केले नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनाही केले. त्यांना असे म्हणायचे होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही.

कारण शिक्षण घेतल्यानंतरही त्यांना सन्मान मिळाला नाही. मुस्लीम कारागिरांच्या धर्मांतरास हेच कारणीभूत झाले असावे. मात्र,आता सर्व कारागीरांना संघटित होऊन उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करावे.

The BJP MP claims that the artisans converted to Islam because they did not get due respect in Hinduism

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात