विशेष प्रतिनिधी
हरिद्वार: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज हरिद्वारमधील कुंभात दुसरे शाही स्नान पार पडत आहे. Today the second royal bath; Supernatural view of Kumbh Mela at Haridwar; See photos
सोमवती अमावस्येच्या शाही स्नानासाठी कुंभमेळा पोलिसांनी भाविकांच्या सोयीसाठी हरकी पैड़ी वर स्नान करण्यास परवानगी दिली होती .
त्यानुसार, सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांनी हरकी पैडीवर स्नान करण्यासाठी तौबा गर्दी केली.
पोलिस प्रशासनाने आखाड्यांसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. शाही स्नान करण्यापूर्वी हरिद्वार मध्ये भाविकांनी तुडूंब गर्दी केली. सामान्य लोक शाही स्नानाच्या अगोदर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आले. यावेळी भाविकांनी कोविड नियमांना पायदळी तुडवले.
कुंभमेळ्याचे आयजी संजय गुंजयान यांनी सांगितलं की, आम्ही कोविड नियमांचे अनुसरण करण्यासाठी सतत लोकांना आग्रह करत आहोत.
प्रचंड गर्दी पाहता घाटावर सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन करणे अशक्य आहे. जर आपण हे करण्याचा प्रयत्न केला, तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App