WATCH : बिग बींचा बंगला म्हणजे बॉलिवूडच्या आठवणींचा ‘जलसा’

बॉलिवूडचे महानायक यांचा जलसा (Jalsa) बंगला सध्या चर्चेत आहे. बिग बींनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळं या बंगल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि त्यामागचा इतिहास सर्वांना समजला. चुपके-चुपके या चित्रपटाला 46 वर्षे झाल्यानं अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट केली. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणंच त्यांच्या या जलसा बंगल्यालाही एक ग्लॅमर आहे. अमिताभ बच्चन यां बंगल्यात त्यांच्यासंपूर्ण कुटुंबाबरोबर म्हणजे जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अराध्या यांच्यासह राहतात. पण चित्रपटक्षेत्राशी संबंधित असा या बंगल्याला सोनेरी इतिहासही आहे. अमिताभ यांच्या पोस्टमधूनच तो सर्वांना समजला.

हेही वाचा –