WATCH : धोनी शून्यावर बाद अन् सोशल मीडियावर Meme चा पाऊस

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्याच चेल्यानं गुरुवार मात केल्याचं पाहायला मिळालं… नवख्या ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघानं तगडा अनुभव असलेल्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धोबीपछाड दिली… या सामन्याची बरीच चर्चा झाली होती… त्याचं कारण म्हणजे ऋषभ पंत ज्याला साक्षात गुरू मानतो त्याच धोनी विरुद्ध त्याचा संघ पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरला… पण चेल्याच्या संघानं विजयी कामगिरी करत स्पर्धेचा श्रीगणेशा विजयानं केला. या सामन्यासाठी धोनीचे चाहतेदेखिल प्रचंड उत्साहात होते… कारण अनेक महिन्यांनंतर धोनी मैदानात उतरणार होता… धोनीच्या स्फोटक फलंदाजीचा ट्रेलरतरी पाहायला मिळणार असं वाटत असतानाच धोनी दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि सर्वांचा हिरमोड झाला… त्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या संदर्भातील मीम्सचा पाऊस आला…meme raining on social media after dhoni get out on zero

हेही वाचा –