कॅश फॉर क्वेरी प्रकरणात TMCने मागितले महुआंचे स्पष्टीकरण; ओब्रायन म्हणाले- संसदीय समितीच्या चौकशीनंतर पक्ष निर्णय घेईल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी रविवारी सांगितले की, पक्षाने महुआंना या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

डेरेक म्हणाले की, आम्ही मीडिया रिपोर्ट्स पाहिल्या आहेत. पक्षाने संबंधित खासदारांना त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचा सल्ला दिला आहे, जे त्यांनी आधीच केले आहे. परंतु, हे प्रकरण जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीशी संबंधित आहे, त्यामुळे सध्या तरी संसदीय समितीला या प्रकरणाची चौकशी करू द्या. तपास पूर्ण झाल्यानंतर पक्ष याबाबत निर्णय घेईल.



तृणमूल म्हणाले- वादात अडकलेल्या व्यक्तीनेच उत्तर द्यावे

महुआंवरील आरोपांबाबत, टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी म्हटले होते की, या प्रकरणी पक्षाला काहीही म्हणायचे नाही. या वादात अडकलेली व्यक्ती याविषयी बोलण्यासाठी उत्तम आहे. त्याच वेळी, टीएमसीच्या आणखी एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले होते की पक्ष नेतृत्व कोणत्याही प्रकारच्या वादात पडू इच्छित नाही, त्यामुळे पक्ष या प्रकरणापासून अंतर ठेवेल.

निशिकांत यांचा आणखी एक आरोप- महुआंचा संसदेचा आयडी दुबईतून उघडला

महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. निशिकांत यांनी शनिवारी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले – काही पैशांसाठी एका खासदाराने देशाची सुरक्षा गहाण ठेवली. याबाबत मी लोकपालकडे तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महुआंवर आरोप केला होता की, महुआंनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे आणि भेटवस्तू घेतल्या होत्या. सभापतींनी हे प्रकरण आचार समितीकडे पाठवले आहे. लोकसभेची आचार समिती 26 ऑक्टोबर रोजी महुआ मोईत्रांनी पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

यासाठी समितीने निशिकांत दुबे यांना पाचारण केले आहे. दुबे यांना नोटीस बजावताना लोकसभेचे उपसचिव बाला गुरु यांनी ही माहिती दिली. निशिकांत सुनावणीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. संसदेच्या समिती कक्षात ही सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात