वृत्तसंस्था
कोलकाता : तृणमूल काँग्रेस (TMC) नेते सैफुद्दीन लस्कर (47) यांची सोमवारी (13 नोव्हेंबर) पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जयनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी दोन्ही हल्लेखोरांना पकडून बेदम मारहाण केली.TMC leader shot dead in West Bengal; Supporters captured two attackers, burned several houses
या हल्ल्यात एका आरोपीचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी कसेतरी दुसऱ्याला वाचवून आपल्यासोबत नेले. येथे टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर परिसरात तणाव पसरला होता. संतप्त समर्थकांनी अनेक घरांना आग लावली. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीपीआय (एम) आणि भाजपच्या गुंडांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफुद्दीन सोमवारी सकाळी नमाजासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
जमावाने लूटमार आणि तोडफोड केल्यानंतर घरांना आग लावली
सैफुद्दीन हे जयनगरच्या बामुनगाची येथील टीएमसीचा प्रदेशाध्यक्ष होते. त्यांची पत्नी पंचायत प्रधान आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर टीएमसी समर्थकांनी शेजारच्या दलुआखली गावात हिंसाचार केला. जमावाने लूटमार आणि तोडफोड करून अनेक घरांना आग लावली.
टीएमसी समर्थकांनी ज्या लोकांची घरे जाळली ते सीपीआय (एम) समर्थक असल्याचे वृत्त आहे. दलुआखली येथील लोकांनी दावा केला की पोलिसांच्या उपस्थितीत त्यांची घरे जाळण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याही आग विझविण्यापासून थांबवण्यात आल्या.
सीपीआय (एम) केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती म्हणाले की, सैफुद्दीन लस्कर यांची हत्या टीएमसी पक्षातील अंतर्गत भांडणाचा परिणाम आहे. माकपला दोष देण्यात अर्थ नाही. सैफुद्दीनची हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी करावा.
ही घटना बोगातुई हत्याकांडाची आठवण करून देणारी असल्याचे सुजन यांनी सांगितले. मार्च 2022 मध्ये, बीरभूम जिल्ह्यातील बोगातुई हत्याकांडात TMC नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर जाळपोळ आणि हिंसाचारात सुमारे 10 लोक मारले गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App