अमेरिकेत शिकणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थी संख्येने गाठला उच्चांक!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थांच्या संख्येने गाठला उच्चांक गाठला आहे. The number of Indian graduate students studying in the US reached a high!!

इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या नवीन अहवालानुसार, 2022 – 2023 या शैक्षणिक वर्षा दरम्यान एकूण 268,923 भारतीय विद्यार्थी अमेरिकन संस्थांमध्ये शिकत आहेत. 2009-10 नंतर प्रथमच अमेरिकेत आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. यामध्ये भारताचा पहिला, तर चीनचा दुसरा क्रमांक आहे.

इन्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनने (IIE) यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, सगल तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षणाकरिता मोठ्या संख्येने भारतातील विद्यार्थी अमेरिकेत जातात, अशी नोंद करण्यात आली आहे. या ओपन डोर्स अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 35% वाढली आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात 268923 इतका उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या 10 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी 25 % पेक्षा जास्त विद्यार्थी भारतीय आहेत.

2022-23 दरम्यान भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या 63 % ने वाढून 165,936 झाली, 2021-22 च्या तुलनेत सुमारे 64,000 विद्यार्थ्यांची वाढ झाली, तर भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये 16 % वाढ झाली. अमेरिकन दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, ओपन डोर्स रिपोर्टच्या आकडेवारीनुसार, भारत 2009 -10 नंतर प्रथमच अमेरिकेत आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे. ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (O.P.T.) या प्रकारच्या तात्पुरत्या कामाच्या परवानगीचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत (69,062) भारत आघाडीवर असल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य संधी शोधण्यात मदत करण्यासाठी, अमेरिकेचा परराष्ट्र विभाग नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि हैदराबाद येथील 6 एज्युकेशन-यूएसए सल्लागार केंद्रांवर विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार, मोफत सल्ला दिला जातो. याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना 4,500 हून अधिक मान्यताप्राप्त उच्च-शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्यास मदत केली जाते.

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले की, अमेरिकेतील प्रत्येक भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना या कामगिरीसाठी मान्यता मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय आणि त्यासाठी अमेरिकेला जाण्याची निवड विद्यार्थी आणि कुटुंबियांनी केलेली एक मौल्यवान गुंतवणूक आहे. यामुळे विविध देशांच्या संस्कृतीची ओळख होत आहेच, शिवाय विद्यार्थ्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होत आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी भारताला पुढे नेण्याबाबत आम्ही उत्सुक आहोत.

The number of Indian graduate students studying in the US reached a high!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात