Tirupati Laddu Prasadam : तिरूपति बालाजीच्या प्रसादात जनावरांच्या चरबीची भेसळ; जगन मोहन रेड्डींच्या बहिणीची अमित शाहांकडे CBI चौकशीची मागणी!!

Tirupati Laddu Prasadam

वृत्तसंस्था

हैदराबाद : जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या प्रसादात जनावरांच्या चरबीची भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात तातडीने CBI चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशाच्या राजकारणात भाऊ जगनमोहन रेड्डी विरुद्ध बहीण शर्मिला एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. Tirupati Laddu Prasadam

आंध्र प्रदेशात वाय. एस. आर. काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना त्यांनी ख्रिश्चन असलेल्या आमदार भूमना करुणाकर रेड्डी यांना तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नेमले होते. स्वतः जगन मोहन रेड्डी हे ख्रिश्चनच आहेत. त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अखंड आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते ख्रिश्चन असूनही त्यांच्या कुटुंबाचे बरीच वर्षे तिरुपती देवस्थान ट्रस्ट वर्चस्व होते.

तिरुपती देवस्थान ट्रस्ट प्रसाद लाडू तयार करताना जनावरांचे चरबी वापरून तयार केलेले तूप वापरत असल्याचा धक्कादायक खुलासा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रयोगशाळेतून आलेल्या पुराव्यांच्या आधारे केला होता त्यामुळे जगभरात खळबळ माजली. तिरुपती बालाजीच्या कोट्यावधी हिंदू भाविकांमध्ये प्रचंड संताप उसळला. प्रसादात भेसळ करून जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने करोडो हिंदू भाविकांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप जगभरातून झाला. Tirupati Laddu Prasadam

आता जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला त्यांच्या विरोधात उतरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांनी तिरुपती बालाजीच्या प्रसादातल्या भेसळीच्या प्रकाराची CBI चौकशीची मागणी केली. प्रसारातल्या भेसळीचे प्रकरण केवळ आंध्र प्रदेश पुरते मर्यादित नाही, तर जगभरातील भाविकांच्या भावना दुखावणारे हे प्रकरण आहे. त्यामुळे त्याची चौकशी केंद्र सरकार मार्फतच करावी, अशी मागणी शर्मिला यांनी करून आपल्या भावाला राजकीय दृष्ट्या खिंडीत गाठले आहे. Tirupati Laddu Prasadam

Tirupati Laddu Prasadam row requesting him to order an immediate CBI investigation

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात