विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कुवेतमधील सुलैबिया क्षेत्रात असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या टायर ग्रेव्हयार्डला नुकतीच आग लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी रेतीप्रमाणं पोत असणारी माती खोदून एक महाकाय खड्डा खणण्यात आला आहे.Tire Graveyard catches fire in Sulawesi, Kuwait
यामध्ये जवळपास 70 लाख टायर आहेत. विस्तीर्ण अशा भूखंडावर पसरलेल्या या जागेला आग लागली तेव्हा आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की याची दृश्यं थेट अंतराळातून दिसत आली.माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार सुलैबिया येथील असंख्य टायर असणाऱ्या या ठिकाणाला टायरचं कब्रस्तान म्हणून ओळखलं जातं. कुवेत आणि काही राष्ट्रांचे हे टायर असल्याचं म्हटलं जातं.
येथील डिस्पोजलची जबाबदारी चार कंपन्यांना देण्यात आली आहे. तर आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर आता अशा प्रकारचे ज्वलनशील पदार्थ देशातून स्थलांतरित करण्यावर चर्चा होत आहेत आणि बरेच प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. या देशात एरवी तापमानाचा पारा 50 अंशांवर पोहोचतो.
Kuwait has the biggest tyre dump in the world. It is now on fire. pic.twitter.com/RsaqMnyJFC — Extinction Rebellion Global (@ExtinctionR) August 6, 2021
Kuwait has the biggest tyre dump in the world. It is now on fire. pic.twitter.com/RsaqMnyJFC
— Extinction Rebellion Global (@ExtinctionR) August 6, 2021
कुवेत सरकारने 30 वर्षांमध्ये जमा झालेल्या टायरची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. रिसायकल करण्यात येणाऱ्या 95 टक्के टायर हटवण्याची योजना आहे.जगभरातील देशांमध्ये वापरलेल्या टायरची विल्हेवाट कशी लावायची हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
टायर जाळल्यामुळे हवेत कार्सिनोजेनिक डाइऑक्साइन्स मिसळले जातात. ही प्रदूषकं अस्थमा आणि अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. तेव्हा आता या समस्येला तोंड द्यायला सर्व राष्ट्र कशी एकत्र येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App