वृत्तसंस्था
इंफाळ : Manipur शुक्रवारी मणिपूरमधील जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह तरंगताना आढळले. यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू झाली, ज्याला आता हिंसक वळण लागले आहे. मैतेई समाजाच्या लोकांनी इंम्फाळमध्ये सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. आंदोलकांनी येथे दगडफेक आणि जाळपोळ केली. इंम्फाळमध्ये टायर पेटवून रस्ते रोखण्यात आले.Manipur
11 नोव्हेंबरला गणवेश परिधान केलेल्या सशस्त्र अतिरेक्यांनी बोरोब्रेका पोलिस स्टेशन कॉम्प्लेक्स आणि सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. यामध्ये 10 दहशतवादी मारले गेले. यावेळी जिरीबाम जिल्ह्यातील बोरोब्रेका पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या मदत शिबिरातून 6 जणांचे अपहरण करण्यात आले. शुक्रवारी सापडलेले तीन मृतदेह या बेपत्ता लोकांचे असल्याचे समजते.
निदर्शनांमुळे मणिपूरच्या पाच खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर सात जिल्ह्यांमध्ये शनिवारी सायंकाळी 5.15 वाजल्यापासून दोन दिवस इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. हे जिल्हे आहेत- इम्फाळ पूर्व, इंम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौबल, कक्चिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर.
आसाममध्ये कुकी अतिरेक्यांच्या मृतदेहांवरून कुकी समुदायाचा निषेध
आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (SMCH) बाहेर शनिवारी सकाळी पोलिस आणि कुकी समुदायाच्या लोकांमध्ये वाद झाला, त्यानंतर पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला.
वास्तविक, मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या 10 अतिरेक्यांचे कुटुंबीय त्यांच्या मृतदेहाच्या मागणीसाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने करत होते.
आसाम पोलिसांनी मृतदेह मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिला जाईल, असे समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मृतदेह तेथेच सोपवण्याची मागणी करत कुटुंबीयांनी दगडफेक केली.
यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि कुटुंबीयांनी मणिपूर पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केले. यानंतर मृतदेह मणिपूरमधील चुराचंदपूर येथे विमानाने नेण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App