विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज चक्क प्राच्यविद्या “संशोधक” बनले आणि त्यांनी भर लोकसभेत महाभारतातील चक्रव्यूहाचा हवाला देत मोदी सरकारला घेरले. त्यांनी महाभारताच्या चक्रव्यूहाची सगळी कहाणी सांगून त्यातल्या सगळ्या पात्रांशी मोदी सरकार मधल्या नेत्यांची नावे जोडली. त्यावेळी सभागृहात थोडा गदारोळ झाला. सभापतींनी हस्तक्षेप केला. त्यामुळे राहुल गांधींनी त्यातली काही नावे मागे घेतली, पण त्यामुळे मूळ कहाणीला कुठलेच डॅमेज झाले नाही. Thousands of years ago, in Kurukshetra, six people trapped Abhimanyu in a ‘Chakravyuh’
त्याचे झाले असे :
पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षनेते यांना राहुल गांधी यांनी या चर्चेची सुरुवात केली. मोदी सरकारच्या विविध योजनांचे त्यांनी वाभाडे काढले. या चर्चेतच त्यांनी महाभारतातल्या चक्रव्यूहाचा संदर्भ दिला. महाभारतामध्ये वीर अभिमन्यूला कौरवांनी चक्रव्यूहात घेरून मारले. चक्रव्यूहात अनेक लोक असतात. परंतु, त्यात सहा प्रमुख असतात. मी चक्रव्यूहाच्या संदर्भात थोडे “संशोधन” केले, तेव्हा मला त्याला पद्मव्यूह असेही म्हणतात असे आढळून आले. पद्मव्यूह म्हणजे लोटस फॉर्मेशन, म्हणजेच कमळ!!
अभिमन्यूल्या चक्रव्यूहात घेरून मारणाऱ्यांमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, कृतवर्मा आणि शकुनी हे सहा जण होते. त्यांनी अभिमन्यूला मारले. 21 व्या शतकात देखील अशाच चक्रव्यूहाची म्हणजेच पद्मव्यूहाची रचना झाली आहे. ते देखील कमळाच्याच रूपात समोर दिसते आहे. या चक्रव्यूहामध्ये घेरून देशातला युवक गरीब, दलित, दिन दुबळे मारले जात आहेत आणि या चक्रव्यूहात नेतृत्व नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल, अदानी, अंबानी यांच्यासारखे सहा जण करत आहेत, असा टोला राहुल गांधींनी मोदी सरकारला मारला.
#WATCH | LoP in Lok Sabha Rahul Gandhi says, "Thousands of years ago, in Kurukshetra, six people trapped Abhimanyu in a 'Chakravyuh' and killed him…I did a little research and found out that 'Chakravyuh' is also known as 'Padmavuyh' – which means 'Lotus formation'. 'Chakravyuh'… pic.twitter.com/bJ2EUXPhr8 — ANI (@ANI) July 29, 2024
#WATCH | LoP in Lok Sabha Rahul Gandhi says, "Thousands of years ago, in Kurukshetra, six people trapped Abhimanyu in a 'Chakravyuh' and killed him…I did a little research and found out that 'Chakravyuh' is also known as 'Padmavuyh' – which means 'Lotus formation'. 'Chakravyuh'… pic.twitter.com/bJ2EUXPhr8
— ANI (@ANI) July 29, 2024
राहुल गांधींनी हा टोला हाणल्याबरोबर त्यांच्या समर्थक खासदारांनी बाके वाजवली. बाकीच्या विरोधकांनीही राहुल गांधींचे समर्थन केले. मात्र, सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या भाषणात लगेच हस्तक्षेप केला. जे या सदनाचे सदस्य नाहीत, त्यांची नावे घेणे नियमाला धरून होणार नाही, असे राहुल गांधींच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अत्यंत चतुराईने राहुल गांधींनी मी या चक्रव्यूहातून अजित डोवाल, अदानी, अंबानी यांची नावे मागे घेतो, असे जाहीर केले. पण त्यांनी नावे घेतल्याचे व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल झाल्या. राहुल गांधींनी भाषणात महाभारताची कथा पुढे सांगणे सुरू ठेवले आणि ते मोदी सरकारला ठोकत राहिले.
#WATCH लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने कहा, "हजारों साल पहले कुरूक्षेत्र में 6 लोगों ने अभिमन्यु को 'चक्रव्यूह' में फंसा कर मारा था…मैंने थोड़ा रिसर्च किया और पता चला कि 'चक्रव्यूह' का दूसरा नाम होता है 'पद्मव्यूह'- जिसका अर्थ है 'कमल निर्माण'। 'चक्रव्यूह' कमल के फूल… pic.twitter.com/4E8OrS5aD4 — ANI_HindiNews (@AHindinews) July 29, 2024
#WATCH लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने कहा, "हजारों साल पहले कुरूक्षेत्र में 6 लोगों ने अभिमन्यु को 'चक्रव्यूह' में फंसा कर मारा था…मैंने थोड़ा रिसर्च किया और पता चला कि 'चक्रव्यूह' का दूसरा नाम होता है 'पद्मव्यूह'- जिसका अर्थ है 'कमल निर्माण'। 'चक्रव्यूह' कमल के फूल… pic.twitter.com/4E8OrS5aD4
— ANI_HindiNews (@AHindinews) July 29, 2024
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App