UN: ‘पाकिस्तानमध्ये दरवर्षी हजारो महिलांचे धर्मांतर आणि शोषण होते’

UN

भारताने पुन्हा पाकिस्तानवर केली जोरदार टीका


न्यूयॉर्क : UN वारंवार फटकारूनही पाकिस्तान आपल्या कुरापती बंद करत नाही. प्रत्येकवेळी संयुक्त राष्ट्रात उघड खोटे ऐकल्यानंतर, तो पुन्हा आपल्या विधानांमधून गरळ ओकत असतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली आणि म्हटले की त्याची कृती चुकीची माहिती पसरवणे आणि खोडकर चिथावणी देण्यासारखे आहे.UN



UNSC खुल्या चर्चेत भारताने आपले विधान केले आणि बैठक आयोजित केल्याबद्दल स्वित्झर्लंडचे आभार मानले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेला संबोधित करताना, न्यूयॉर्कमधील यूएनमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, या महत्त्वाच्या वार्षिक चर्चेत असा राजकीय प्रचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्या देशातील अल्पसंख्याक समाजातील, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांच्या महिलांची स्थिती दयनीय आहे, हे आपण जाणतो. ते म्हणाले की, इस्लामाबादने पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या दयनीय स्थितीला प्रतिसाद दिला पाहिजे.

Thousands of women are converted and exploited in Pakistan every year India criticizes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात