विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्ली मधील जंतर मंतर इथे झालेल्या एका आंदोलनादरम्यान बोलताना विधा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. टीका करताना त्यांनी हर देखील सांगितले की कलम 370 हटवल्यानंतर काश्मिरची जी इमेज सरकार लोकांपुढे मांडत आहे तशी अजिबात नाहीये हे सांगण्यासाठी मी इथे आले आहे असे त्या म्हणाल्या.
This seems to be Godse’s country, not Gandhi’s; Vidha People’s Democratic Party President Mehbooba Mufti sharply criticizes the central government
मुफ्ती पुढे म्हणाल्या, केंद्र सरकार भारतीय जनतेसमोर काश्मीरमध्ये शांतता पूर्ण स्थिती असल्याचा एक देखावा तयार करत आहे. पण काश्मीरमध्ये रस्त्यावर रोज रक्त सांडताना आम्हाला पाहायला मिळते. छोट्या छोट्या कारणांवरून लोकांविरुद्ध दहशतवादविरोधी कायदा लावला जात आहे. काश्मिरी पंडितांची दिवसाढवळ्या हत्या केली गेली. एका बिहारी व्यक्तीला देखील ठार मारण्यात आले. मागील जवळपास 18 महिण्यापासून एक मुलगी सैन्याच्या हातून मारल्या गेलेल्या आपल्या वडिलांचे प्रेत ताब्यात मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. पण इथे कोणाच्याही हाकेला दाद दिली जात नाही. असे म्हणत त्यांनी संविधानाबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाला ‘तुकडे तुकडे गँगचा’ सदस्य म्हणून हिणवले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मेहबूबा मुफ्ती यांचे राहुल गांधी, सलमान खुर्शीद यांच्या सुरात सूर!!
पुढे त्या म्हणतात, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना इथे खलिस्तानी म्हणून संबोधले जाते आणि त्यांच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केला जातो ल. हा कोणता भारत आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी या वेळी विचारला आहे.
तसेच त्या पुढे म्हणतात की, काश्मीरच्या प्रश्नांबद्दल देशाच्या जनतेपुढे जे कोण आपले मत मांडू इच्छितो त्याला पाकिस्तानी म्हणून संबोधले जाते. हा गांधींचा देश नव्हे तर गोडसेचा यांचा देश वाटत आहे. काश्मीरमधील लोकांना बोलण्याचेही स्वातंत्र्य नाहीये अशी खंत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App