
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वाधिक मोठी एडटेक स्टार्ट अप कंपनी बायजूस ने शाहरुख खानच्या सर्व जाहिरांतींवर बंदी आणली आहे. मुंबई येथील क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी आरोपी आर्यन खान याचे वडील शाहरुख खानला बायजूसने मोठा झटका दिला आहे. शाहरुख खान हा 2017 पासून बायजूसचा ब्रँन्ड अॅम्बेसेटर आहे.This rite is not on our child! Shah Rukh Khan’s commercials stopped by Baijus
अग्रिम बुकिंग व्यतिरिक्त बायजूसने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. खानच्या स्पॉन्सरशिप डिल्समध्ये बायजूस हा सर्वाधिक मोठा ब्रँन्ड होता. या व्यतिरिक्त त्याच्याकडे ह्युंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिज्म सारख्या कंपन्यांच्या सुद्धा जाहिराती आहेत.
बायजूस शाहरुख खानला 3 – 4 कोटी रुपये सुद्धा देत होती. अंमली पदार्थ प्रकरणी कोटार्ने आर्यन खान याचा जामिन फेटाळल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठण्यात आले आहे. तसेच आर्यन खान याच्यासोबत अन्य 5 जणांनाही त्याच तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यावर अनेक मिम्स व्हायरल झाले होते. यामध्ये बायजूसचे नाव घेऊन असे संस्कार आमच्या मुलांना नकोत असे म्हटले होते. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
This rite is not on our child! Shah Rukh Khan’s commercials stopped by Baijus
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Array