WHO ने कोरोनाचा “भारतीय अवतार” हा शब्दप्रयोग वापरलाच नसल्याचा केंद्र सरकारचा स्पष्ट खुलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – भारतात आढळलेला कोरोना विषाणूचा नवा अवतार (व्हेरीयंट) वेगाने संक्रमणकारी आणि पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना WHO ने दिल्याच्या बातम्या सगळ्या मीडियात फिरविण्यात आल्या. पण प्रत्यक्षात WHO ने कोरोनाचा “भारतीय अवतार” हा शब्दप्रयोग वापरलाच नसल्याचा स्पष्ट खुलासा केंद्र सरकारने आता केला आहे. This is to clarify that WHO has not associated the term “Indian Variant” with the B.1.617 variant of the coronavirus in its 32 page document.

B.१.६१७ प्रकारचा हा विषाणू कदाचित कोरोना लसींनाही जुमानणार नाही अशीही भीती, डब्ल्यूएचओ ने व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या. या विषाणूला कथित स्वरूपात जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय अवतार म्हटल्याचेही प्रसिध्द झाले. परंतु, प्रत्यक्षात कोरोनाचा “भारतीय अवतार” हा शब्दप्रयोग जागतिक आरोग्य संघटनेने वापरलेलाच नाही. यासंबंधीचे सगळे मीडिया रिपोर्टस आधारहीन आणि तथ्यहीन असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.

B.१.६१७ या नव्या विषाणूंची मारक क्षमता ही स्वतःमध्ये विकसित केल्याची अशा शंका बोलून दाखवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले, की हा नवा विषाणू संपूर्ण जगासाठी आगामी काळात चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगाला त्या विषाणूबद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू तुलनेने कित्येक पटीने जास्त संक्रमक आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये विदर्भाच्या काही भागात हा विषाणू सर्वप्रथम आढळला होता. त्यानंतर भारतीय वैद्यक तज्ञांनी याबाबत वारंवार इशारा दिला होता. आता या विषाणूने संक्रमणाची त्याची पातळी वाढवली आहे, असाही इशारा देण्यात आला आहे. मात्र, याचा भारतीय अवतार या शब्दाशी काहीही संबंध नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

 

This is to clarify that WHO has not associated the term “Indian Variant” with the B.1.617 variant of the coronavirus in its 32 page document.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात