विशेष प्रतिनिधी
सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलीसच वऱ्हाडी बनले. पळून गेलेल्या प्रेमी युगलाच पोलीस ठाण्यातच विवाह लावण्यात आला. यासाठी पोलीसांनी दोघांच्याही घरच्यांची समजूत काढून त्यांना तयार केले. बिहारीगढ पोलीस ठाण्यात युवक-युवतीच्या कुटुंबीयांच्या सहमतीने हा सोहळा पार पडला.The young man and the young woman who ran away got married at the police station
अब्दुलपूर गावातील एकाने त्याची मुलगी मीनाक्षी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी रहीमपूरमध्ये राहणाऱ्या एकाच्या घरातून तिला शोधून काढले.
युवक सूरज (२१) व युवती मीनाक्षी (१९) यांनी सज्ञान असल्याचे पुरावे दिले व विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली.हे युगुल एकाच समुदायाचे आहेत व विवाह करू इच्छित आहेत, असे पोलिसांना त्यांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून समजावले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी विवाहाला सहमती दिली. पोलीस ठाण्यातच पुरोहित बोलावून समाजातील जबाबदार लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ साजरा करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App