केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे.The world’s longest 11.5 km ropeway will be constructed for Kedarnath Yatra
विशेष प्रतिनिधी
डेहराडून : सध्या जगातील सर्वात लांब रोपवे मेक्सिको सिटीमध्ये आहे, ज्याला केबल बस २ म्हणून ओळखले जाते.त्याची लांबी १०.५५ किमी आहे.दरम्यान केदारनाथ धाम यात्रा भाविकांसाठी जगातील सर्वात लांब रोपवेचे स्वप्न साकार होणार आहे.यासाठी उत्तराखंड सरकारने जोरदार काम सुरू केले आहे. केदारनाथ धाममध्ये ११.५ किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे.
केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे भाविकांची यात्रा अधिक सहज होणार आहे.या रोपवेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ भेटीदरम्यान केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये लवकरच रोपवेचे काम सुरू होईल, असे जाहीर केले होते. आता याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
केदारनाथ : ९ कारागीर अन् १८ मॉडेल, जाणून आदि शंकराचार्यांच्या १२ फुटी पुतळ्याच्या उभारणीमागचे रहस्य
अवघ्या एका तासात प्रवास होणार पूर्ण
समुद्रसपाटीपासून ११,५००फूट उंचीवर उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक केदारनाथ आहे.दरम्यान केदारनाथ धाम यात्रेसाठी सध्या भक्तांना गौरीकुंड ते केदारनाथ धाम असा १६ किमीचा प्रवास करावा लागतो,त्यामुळे भक्तांचा संपूर्ण दिवस १६ किमीचा प्रवास करण्यात जातो. मात्र सोनप्रयाग ते केदारनाथ असा रोपवे बांधण्यात आल्याने आता हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App