नेहरू आणि नरसिंह रावांनी काश्मीरमध्ये सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते…?? फारूख अब्दुल्लांच्या दाव्यात सत्यता किती…??

नाशिक : भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी आणि नंतरच्या एका पंतप्रधानांनी काश्मीरी जनतेला सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते. पण कालांतराने ते मागे हटले, असा गंभीर आरोप जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे… पण या त्यांच्या दाव्यात सत्यता किती आणि राजकीय आरोपाचा भाग किती हे इतिहासाच्या कसोटीवर नीट तपासून पाहिल्यावर त्यातले तथ्य कळून येते.The truth behind Farooq Abdullah`s claim about promises of Nehru and Narasimha rao`s assurence of plebisite in jammu and kashmir

काश्मीरमध्ये कबिल्यांच्या वेशात पाकिस्तानी सैन्याने हल्ला केल्यानंतर काश्मीरला पाकिस्तानच्या पंजातून सोडवून काश्मीरचा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी संयुक्त राष्ट्र संघाकडे नेला हे खरे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि पाकिस्तान यांनी संघर्षाचा मार्ग सोडून वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविण्याची सूचना केली होती.



या वाटाघाटींमधला एक घटक म्हणून सार्वमताचा (plebiscite) उल्लेख करण्यात आला होता. पण तो एकमेव घटक नव्हता. काश्मीरमध्ये चिरस्थायी शांतता हा सर्वांत महत्त्वाचा घटक होता. आणि त्यासाठी नेहरूंनी तडजोडीची भूमिका म्हणून सार्वमताचे आश्वासन दिले होते हे खरे आहे.

पण कालांतराने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याची देखील परिस्थिती बदलली. त्यामध्ये सार्वमताचा (plebiscite) विषय मागे पडला. काश्मीरमध्ये दीर्घकाळ नियमितपणे सार्वत्रिक निवडणूका होत राहिल्या. तेथे लोकनियुक्त सरकारांचा कारभार चालला ही राजकीय वस्तुस्थिती आहे. हा झाला नेहरू आणि नंतरच्या पंतप्रधानांचा कालावधी.

१९९० च्या दशकात जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी वाढून दहशतवादाने टोक गाठले होते, तेव्हा त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या बुर्किना फोसोच्या दौऱ्यावर असताना भारतीय जनतेला उद्देश्यून एक भाषण केले होते. त्या भाषणात नरसिंह रावांनी sky is the limit, पण स्वातंत्र्य (independence) नाही, असा उल्लेख केला होता.

याची आठवण केसरीचे माजी संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी करून दिली आहे. पण ते सार्वमत (plebiscite) घेण्याचे आश्वासन नव्हते, तर अधिक स्वायत्तता देण्याचे होते. दहशतवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत आणि शरण यावे, असे त्यांनी म्हटले होते, याची आठवण देखील श्री. गोखले यांनी करवून दिली आहे.डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी नेहरू आणि नरसिंह राव या दोन पंतप्रधानांची नावे घेऊन केलेल्या दाव्यांबाबत वर मांडली, ती वस्तुस्थिती आहे.

The truth behind Farooq Abdullah`s claim about promises of Nehru and Narasimha rao`s assurence of plebisite in jammu and kashmir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात