विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मामाचा बॅनर्जी यांना हिंदुत्वाची आणि भगव्या रंगाची एलर्जी आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या तृणमूल काँग्रेसी राजकारणाला हिंदुत्व सूट होत नाही. त्यामुळे राजकीय भाषणात त्या हिंदुत्वाला विरोध करतात हे उघड आहे. पण आता त्यांना भगवा रंग इतरत्र देखील नकोसा झाला आहे. कारण त्या टीम भारताच्या प्रॅक्टिसच्या भगव्या जर्सी वर देखील भडकल्या आहेत. The team flaunted India’s saffron practice tshirts says mamta banerjee
उद्या 19 नोव्हेंबर 2023 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. त्यापूर्वी कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर टीम भारत प्रॅक्टिस करताना दिसली. त्यावेळी सगळ्या टीमने भगव्या रंगाच्या जर्सी परिधान केली होती. यावेळी टीमने कसून प्रॅक्टिस केली. त्या प्रॅक्टिस कडे ममता बॅनर्जींचे लक्ष गेले नाही. पण टीम भारताच्या भगव्या जर्सी कडे मात्र जरूर लक्ष गेले. त्या भगव्या जर्सीवर त्या भडकल्या.
अलीकडे मोदी सरकार सगळ्यांचेच भगवीकरण करत आहेत मेट्रोची स्टेशन्स पण भगव्या रंगात रंगवली जात आहेत. टीम भारताची जर्सी निळी होती. आम्हाला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. ते उद्या निश्चित विश्वचषक जिंकतील, पण त्यांना भगवी जर्सी घालायचे कारण काय??, असा सवाल ममतांनी केला.
पण खुद्द ममतांनी सत्तेवर आल्याबरोबर कोलकत्त्यात आणि बंगालमध्ये हजारो भिंती निळ्या आणि पांढऱ्या रंगाने रंगविल्या हे मात्र त्या विसरल्या आणि भगव्या रंगाची एलर्जी त्यांनी स्वतःच्या तोंडाने जाहीर करून बसल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App