देशातील कोरोना संसर्गाचा दर कमी, उत्तर प्रदेशात ०.५६ तर महाराष्ट्रात ०.७६, दुसरी लाट ओसरू लागली , अनेक राज्यांमध्ये संकेतांक घसरला

कोरोनाच्या दुसºया लाटेने निर्माण झालेले धास्तीचे वातावरण निवळायला सुरूवात झाली आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर सांगणारा आर संकेताक (आर नॉट व्हॅल्यू) प्रथमच एकपेक्षा कमी झाला आहे. सर्वात कमी आर संकेताक दिल्लीमध्ये ०.४३, उत्तर प्रदेशात ०.५६ आहे. महाराष्ट्रात आर संकेतांक ०.७६ तर केरळमध्ये ०.७८ आहे. मात्र, यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.The rate of corona infection in the country has come down, R not value 0.56 in Uttar Pradesh and 0.76 in Maharashtra.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण झालेले धास्तीचे वातावरण निवळायला सुरूवात झाली आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर सांगणारा आर संकेताक (आर नॉट व्हॅल्यू) प्रथमच एकपेक्षा कमी झाला आहे.

सर्वात कमी आर संकेताक दिल्लीमध्ये ०.४३, उत्तर प्रदेशात ०.५६ आहे. महाराष्ट्रात आर संकेतांक ०.७६ तर केरळमध्ये ०.७८ आहे. मात्र, यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.



देशात कोरोना महामारी सुरू झाल्यपाासून प्रथमच आर संकेतांक ०.८२ एवढ्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. महामारी संपविण्यासाठी हा संकेतांक १हून कमी कायम राखणे अत्यावश्यक असल्याचे मानले जाते.

आर संकेतांक याचा अर्थ एक कोरोना रुग्ण किती जणांना बाधित करू शकतो. देशाचा आर संकेतांक ०.८२ इतका आहे याचा अर्थ १०० कोरोना रुग्ण असतील तर त्यांच्यामुळे ८२ लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते.

देशात फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली त्यावेळी संकेतांक पुन्हा १ पेक्षा वर गेला. एप्रिलच्या अखेरपर्यंत तो १.३ पर्यंत नोंदविण्यात आला. मंगळवारी आतापर्यंतची निचांकी पातळी नोंदविण्यात आली.

चेन्नईतील गणित विज्ञान संस्थेतील संशोधक सीतभ्र सिन्हा यांनी केलेल्या संशोधनानुसार देशातील आर संकेतांक निचांकी पातळीवर आल्याचे सिध्द झाले आहे. सलग दोन आठवडे हा संकेतांक १ हून कमी राहिलेला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकधील कमी झालेली रुग्णसंख्या हे त्याचे कारण आहे. कोरोना साथीचा देशात प्रवेश झाला त्यावेळी गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल या कालावधीत १.६ ते १.८पर्यंत उच्चांकी पातळीवर होता. त्यानंतर त्यात सातत्याने घट दिसून आली.

सप्टेंबरपासून पहिली लाट ओसरण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी प्रथमच हा संकेतांक १ हून कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली त्यावेळी संकेतांक पुन्हा १ पेक्षा वर गेला.

महाराष्ट्र, कर्नाटकने रुग्णवाढ रोखली असली तरी अद्यापही आर संकेतांक ०.७६ आहे. कोरोना प्रतिबंधाचे मॉडेल म्हणविल्या जाणाऱ्या केरळमध्ये हा संकेतांक ०.८० आहे. सर्वात कमी आर संकेतांक दिल्लीमध्ये ०.४३ तर उत्तर प्रदेशात ०.५६ आहे. कर्नाटकात ०.८० आहे.

देशातील दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी तामिळनाडू, ओडिशा आणि आसाममध्ये आर संकेतांक एकच्या पुढे असून यामुळे कोरोनाच्या उद्रेकाचा धोका कायम आहे. तामिळनाडूत १.२२, ओडिशामध्ये १.०६ तर आसाममध्ये आर संकेतांक १.२१ आहे. कोलकत्ताही धोक्याच्या उंबरठ्यावर असून येथे संकेतांक ०.९३ इतका आहे.

The rate of corona infection in the country has come down, R not value 0.56 in Uttar Pradesh and 0.76 in Maharashtra.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात