देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation

G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी केले. यानुसार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून जी -7 परिषदेत सहभागासाठी पंतप्रधान मोदींना दिलेल्या आमंत्रणाचा आदर आहे, परंतु देशातील कोरोनाची सद्य:स्थिती पाहता पंतप्रधान जी-7 परिषदेत वैयक्तिकरीत्या उपस्थित राहणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.” Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी केले. यानुसार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून जी -7 परिषदेत सहभागासाठी पंतप्रधान मोदींना दिलेल्या आमंत्रणाचा आदर आहे, परंतु देशातील कोरोनाची सद्य:स्थिती पाहता पंतप्रधान जी-7 परिषदेत वैयक्तिकरीत्या उपस्थित राहणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.”

कॉर्नवॉलमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी होणाऱ्या जी-7 परिषदेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

जी-7 परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारखे क्वाड नेते कॉर्नवॉलमध्ये व्यक्तिगतपणे भेट घेतील, असे म्हटले जात आहे.

तत्पूर्वी, या चार नेत्यांमध्ये 12 मार्च रोजी एक आभासी बैठक झाली होती, जी क्वाड देशांच्या नेत्यांमधील पहिली बैठक होती. जी-7 मध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात