राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना या महिन्यापासूनच पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. १४ मे पासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.The Prime Minister promised that farmers in West Bengal would get the benefit of PM Kisan Yojana
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना या महिन्यापासूनच पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. १४ मे पासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेली केंद्राशी उभा दावा मांडत लाखो शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान किसान योजनेपासून दूर ठेवले.
निवडणुका संपल्यावर तरी आता आपले राजकारण बंद करा असे केंद्राने सांगितल्यावर त्यांनी हेकेखोरपणा सोडला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील लाखो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. ममता बॅनर्जी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यानंतर ३ मे रोजी केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ममता बॅनर्जी यांना विनंती केली की राज्यात पंतप्रधान किसान योजना लागू करण्याचे आदेश त्यांनी आपल्या अधिकाºयांना द्यावेत.
त्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी हे आदेश दिल्याने तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्याप्रमाणे १४ मे पासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे.
विशेष म्हणजे निवडणुकांचे राजकारण संपल्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला. योजनेचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते.
त्यामध्ये म्हटले होते की, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की बंगालमधील निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आपण शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक शेतकऱ्याला अठरा हजार रुपये मिळणा असल्याचे आपण म्हटले होते.
वास्तविक ममता बॅनर्जी यांनीच राज्यात पंतप्रधान किसान योजना आणि आयुष्यमान भारत योजना राबविण्यास मंजुरी दिली नव्हती. मात्र, त्यांच्या या राजकारणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. केंद्राकडून प्रत्येक शेतकऱ्यांला दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांचे अनुदान थेट बॅँक खात्यात जमा करण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App