पश्चिम बंगालमध्ये अराजकता, पुढील काही दिवसांत नरक बनेल राज्य, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली भीती


ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. राज्यात अराजकता पसरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्य नरक बनेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली आहे.Anarchy in West Bengal, state to become hell in next few days, fears former Justice Markandey Katju


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. राज्यात अराजकता पसरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्य नरक बनेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली आहे.

काटजू यांनी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केल्यावर अनेक गुंड, लफंगे आणि बेरोजगार त्यांच्या पक्षात आले. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत.



ममता बॅनर्जींना आपण सत्तेवर आणले त्यामुळे नोकऱ्यावर आपलाच अधिकार आहे. मात्र, राज्यात नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून लुटालूट, धमक्यांचे सत्र सुरू आहे.

काटजू यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना हिटलरशी केली आहे. ते म्हणतात, जर्मनीमध्ये १९३३ साली हिटलर सत्तेवर आल्यावर त्याचे कार्यकर्ते असेच सैराट झाले होते. त्यांनी ज्यू लोकांची घरे लुटली. आपल्या राजकीय विरोधकांना मारहाण सुरू केली.

त्याच्या पक्षातील लोकांना वाटत होते की हिटलर सत्तेवर आल्यावर त्याची फळे आपल्याला मिळायला हवीत. पश्चिम बंगालमध्ये अगदी तसेच झाले आहे.

हे सगळे गुंड तृणमूल कॉँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने लोक त्यांच्याविरुध्द तक्रार करण्यास घाबरतात. पोलीसांनाही त्यांची भीती वाटते कारण ममता बॅनर्जी नेहमीच त्याांची पाठराखण करतात.

ममता बॅनर्जी यांची वर्तणूक हुकूमशहासारखी असल्याचा आरोप करून काटजू म्हणतात, जाधवपूर विद्यापीठातील प्रा. अंबिकेश महापात्रा यांनी ममतांचे कार्टून सोशल मीडियावर शेअर केले म्हणून त्यांना अटक करण्यात अली.

शिलादित्य चौधरी नावाच्या एका शेतकऱ्याने बैठकीत केवळ ऐवढे म्हटले की ममतांनी शेतकऱ्याना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यांना लगेच माओवादी ठरवून अटक करण्यात आली.

पश्चिम बंगालमध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. पुढील काळात तर नरकापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल.

आपल्या प्राचीन तत्वज्ञांनी मत्स्य न्याय नावाची एक कल्पना मांडली होती. त्याचा अर्थ मोठे मासे छोट्या माशांना गिळून टाकतात. आर्य चाणक्य म्हणतात समाजाच्या ºहासाचे हे दर्शक असते. त्याच प्रमाणे बंगालमध्ये मत्स्य न्याय आला आहे. त्यामुळे राज्याची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे.

Anarchy in West Bengal, state to become hell in next few days, fears former Justice Markandey Katju

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात