कोरोना लसीकरण झालेल्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी कमी, केंद्र सरकारने व्यक्त केली चिंता

देशात कोरोनाचा धोका वाढत असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव दिसत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. केंद्र सरकारने यावर चिंता व्यक्त केली आहे.The percentage of women vaccinated against corona is lower than that of men, the central government said


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा धोका वाढत असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव दिसत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. केंद्र सरकारने यावर चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ज्यांनी ही लस दिली आहे त्यातील 54 टक्के पुरुष आणि 46 टक्के महिला आहेत. लोकसंख्येचे प्रमाण पाहिले तर देशात पुरुष आणि महिलांमधील फरक फक्त एक टक्का आहे.



या असंतुलनाचे मुख्य कारण म्हणजे महिलांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती पोहोचलेली नाही. त्याबाबतचा प्रचार झालेला नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर महिलांना सोप्या पध्दतीने प्रवेश मिळत नाही.

लसीकरणाच्या बाबतीत दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पुरुष आणि स्त्रियांमधील ही अंतर सर्वात जास्त आहे. 58 टक्के पुरुषांचे लसीकरण झाले आहे. मात्र केवळ 42 टक्केच महिलांचे लसीकरण झाले आहे. आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश ही अशी चार राज्ये आहेत जेथे लसीकरण केलेल्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात, येत्या काही काळात ही असमतोल दूर करावी लागेल. आम्हाला लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल.

देशाच्या तुलनेत आंध्र प्रदेशात मात्र पुरुषांचे लसीकरणाचे प्रमाण ४६ टक्के तर महिलांचे प्रमाण ५३ टक्के आहे. केरळमध्येही ४८ टक्के पुरुष तर ५२ टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे. छत्तीसगडमध्येही पुरुषांचे ४९.६ टक्के आणि ५० टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे.

The percentage of women vaccinated against corona is lower than that of men, the central government said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात