प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दक्षिणेत पक्ष संघटनेत जान फुंकत असताना विविध प्रदेशांच्या काँग्रेस समित्यांनी राहुल गांधींच्या अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यांच्या काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारावे यासाठी एकमताने ठराव संमत केले आहेत. आज त्यामध्ये महाराष्ट्राचा ही समावेश झाला आहे. The Maharashtra Pradesh Congress Committee also raised its hands in support of Rahul Gandhi
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्रातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनीच अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी विनंती करणारा ठराव हात उंचावून मंजूर करण्यात आला तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि संपूर्ण प्रदेश समितीची पुनर्रचना करावी यासाठी त्यांना सर्वाधिकार देण्याचा ठराव देखील संमत करण्यात आला.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा एकीकडे विशिष्ट मुद्द्यांवर वादग्रस्त ठरत आहे. राहुल गांधींनी यात्रेमध्ये तामिळनाडू आणि केरळ मधील चर्चेस आणि मशिदी यांना भेट देण्यावर भर ठेवला आहे. काँग्रेससाठी अल्पसंख्यांक मतांची पुन्हा जोडणी करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
पण त्याचवेळी एक नवा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी विविध प्रदेशांच्या काँग्रेस समित्या त्यांना पाठिंबा देणारे ठराव संमत करत आहेत. एक प्रकारे काँग्रेसमध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून राहुल गांधींचा संघटनात्मक पातळीवर उदय होताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सारख्या मोठ्या राज्याच्या काँग्रेस समितीने राहुल गांधींना अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकमुखाने पाठिंबा देणे हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीत खूप मोठे पाठबळ ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App