वृत्तसंस्था
कोलकाता : प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाने पश्चिम बंगालच्या बंदर विकास क्षेत्रात लक्ष घातले असून त्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक देखील केली आहे. पश्चिम बंगाल मध्ये ताजपूर येथे खोल समुद्रात बंदर विकास करणे त्याचबरोबर एसीझेड मध्ये गुंतवणूक करणे या दृष्टीने अदानी समूहाने वेगाने काम सुरू केले असून त्यांची 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक येथे होणार आहे. यामुळे राज्यातील 25000 तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ममता बॅनर्जी यांचा सरकारमधील मंत्री आणि कोलकात्याचे महापौर फरीद हकीम ही माहिती दिली आहे. 25000 crore investment of Adani in Mamata’s Bengal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी अदानी आणि अंबानी या दोन उद्योगपतींची बाजू घेऊन त्यांनाच श्रीमंत केल्याचा आरोप विरोधक करत असतात. परंतु, दोन्ही उद्योगपती देशातल्या विविध राज्यांमध्ये मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. ज्या राज्यांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालची भाजप सरकारे नसून राजकीय दृष्ट्या त्यांच्या विरोधकांची सरकारे आहेत, तेथेही हे उद्योगपती मोठे गुंतवणूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार असताना तिथल्या बंदर विकासात अदानी उद्योग समूह मोठी गुंतवणूक करून योगदान देत आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (अदानी पोर्ट्स-एपीएसईझेड), अदानी समूहाची कंपनी, पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहे.
हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स ही ताब्यात
देशातील सर्वात मोठे खाजगी बंदर ऑपरेटर APSEZ ने येथील हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स (HDC) चे ताबा घेतला आहे. यासह, कंपनीने पश्चिम बंगालच्या सागरी क्षेत्रात अधिकृत प्रवेश केला आहे.
300 कोटींची गुंतवणूक होणार आहे
श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट (पूर्वीचे कोलकाता पोर्ट ट्रस्ट) यांनी गुरुवारी अधिकृतपणे हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचे ऑपरेशन APSEZ कडे सुपूर्द केले. कंपनी बंदराच्या धक्क्या क्र. 2 श्रेणीसुधारित आणि यांत्रिकीकरणावर काम करेल. या प्रकल्पात 298.25 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल आणि 2024-25 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या बंदराचा ताबा घेण्यासाठी गौतम अदानी यांचे चिरंजीव APSEZ चे करण अदानी यांनी ममता बॅनर्जी यांची या वर्षाच्या पहिल्या ती तिमाहीतच भेट घेतली होती. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांचे सरकार ताजपूर ग्रीनफील्ड बंदर प्रकल्पावर वेगाने काम सुरू केले आहे. येथेच अदानी समूहाचे 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक असून तब्बल 25000 लोकांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App