प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यंतरी प्रख्यात उद्योजक गौतम अदानी यांचे कौतुक केले होते. अदानींनी शून्यापासून सुरुवात करून गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. देशाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात त्यांचे योगदान मोठे आहे, अशा शब्दांमध्ये पवारांनी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कार्यक्रमात गौतम अदानी यांची स्तुती केली होती. या कौतुकाचे “रहस्य” आता उलगडते आहे. तसेच पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचा प्रस्ताव रद्द करण्याचे खरे गुपितही उलगडले आहे. The international airport is not in Purandar, but Adani’s private airport in Baramati !!
कारण लवकरच बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर खासगी विमानतळ उभारण्यात येणार आहे आणि तो अदानी यांचा खाजगी विमानतळ असणार आहे!! याचा अर्थ पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे.
– अदानी लॉजिस्टिक्स पार्क
बारामती दौंड आणि पुरंदर या 3 तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे 3500 एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये खासगी विमानतळ प्रस्तावित आहे. या संदर्भातील प्रस्ताव औद्योगिक महामंडळाने केंद्र शासनाला पाठवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. खेड पुरंदर अशी तालुक्यांची अदलाबदल त्यासाठी झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळजवळ निश्चित झाला असताना राज्य शासनाने पाठवलेल्या नवीन जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द करत मोठा धक्का दिला आहे. परंतु यामागची खरी वस्तुस्थिती आता समोर आली आहे.
पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा परवाना राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रद्द केला आहे. आता अदानी समूहाने या प्रस्तावित विमानतळाच्या लगत किंबहुना विमानतळाच्या क्षेत्रात जाणाऱ्या काही गावांमध्ये देखील मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
– 8 गावे 3500 एकर जमीन
मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्कसाठी पुरंदर तालुक्यातील राजुरी, पिसे, नायगाव आणि पिंपरी बारामती तालुक्यातील आंबी, भोंडवे वाडी आणि चांदगुडे वाडी तर दौंड तालुक्यातील खोर या 8 गावांमधील 3500 एकर जमीन घेण्यात येणार आहे. औद्योगिक महामंडळाने या जागेचे सर्वेक्षण करून मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कच्या आराखड्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठवला आहे.
विमानतळाच्या प्रस्तावानंतर पुरंदर तालुक्यातील या परिसरात अनेक उद्योजकांकडून प्रकल्पांसाठी जागेची मागणी येऊ लागली आहे. केंद्र सरकारने नुकताच पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा प्रस्ताव आणि मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विमानतळ पूर्वेला होणार की खेड तालुक्यात याबद्दल संभ्रम आहे. पुरंदर विमानतळाची मान्यता रद्द झाली असली तरी मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव मात्र गतीने पुढे गेला असून, लवकरच त्याला केंद्र सरकार मान्यता देईल, अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली आहे.
– गाठीभेटींचे रहस्य
मध्यंतरीच्या पवार – प्रफुल्ल पटेल अचानक अहमदाबाद भेट, तसेच मोदी – पवारांच्या भेटी त्यानंतरच्या पवारांकडून अदानी यांची स्तुती. या सगळ्याचे रहस्य बारामतीच्या खासगी विमानतळावर येऊन पोहोचले नाही ना!!, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App