अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!


संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या भांडणाला आलेली विषारी फळे नाहीत तर दुसरे काय म्हणायचे?? Pro-Hindu parties are not the poisonous fruit of the quarrel, but what else to say

अकबरुद्दीन ओवैसी यांचे भाषण जेवढे विखारी होते, त्याला त्यांची वैयक्तिक राजकीय मस्ती जशी कारणीभूत आहे, तितकीच हिंदुत्ववाद्यांमधली भांडणे देखील कारणीभूत आहेत… ही कितीही नाकारली वस्तुस्थिती आहे!! संभाजीनगर मधल्या हिंदुत्ववाद्यांच्या भांडणातच एआयएमआयएमचा खासदार निवडून आला. अवघ्या 4000 मतांनी इम्तियाज जलील निवडून आल्यामुळे आज अकबरुद्दीन ओवैसी यांना राज ठाकरेंना “कुत्ता”, “बेघर” आणि स्वतःचा एक खासदार आहे, असे म्हणायचे धारिष्ट्य झाले. तेथे शिवसेना – भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष जीवाच्या आकांताने भांडले नसते, तर इमतियाज जलीलच काय पण अकबरुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा कोणी आमदार – खासदार निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही.

पण चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब पाटील दानवे या दोन हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये राजकीय वैर एवढे विकोपाला गेले त्याच्यातून एआयएमआयएम पक्षाचा लोकसभेत शिरकाव झाला. ही स्थानिक पातळीवरची सर्व हिंदुत्ववादी पक्षांची खऱ्या अर्थाने राजकीय हानी आहे!!

– आक्रस्ताळी भाषेचे कारण

अकबरुद्दीन ओवैसीची आक्रस्ताळी भाषा नवी नाही. त्याच्या दर्पयुक्त आणि धमकीयुक्त भाषेला घाबरण्याचेही कारण नाही. पण ही भाषा तोंडातून काढण्याची हिंमत होते, ती त्याच्या स्वबळावर नव्हे, तर प्रबळ हिंदुत्ववादी पक्षांच्या भांडणामुळे होते, ही यातली खरी खंत वाटणारी वस्तुस्थिती आहे.



– एकमेकांची “पोलिटिकल स्पेस” खाणे गैर

राज ठाकरे यांनी भले आज हिंदुत्वाची शाल पांघरली असेल, हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले असेल पण हेच ते राज ठाकरे होते, त्यांना स्वतःची “पोलिटिकल स्पेस” मिळवता आली नाही, म्हणून 2019 च्या निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत होते. शिवसेना काय किंवा मनसे काय यांची “पोलिटिकल स्पेस” भाजप सारख्या तिसऱ्या हिंदुत्ववादी पक्षाने खाल्ल्याने त्यांचे भाजपशी भांडण आहे. भाजपला स्वतःचा विस्तार करायचा आहे. लोकशाहीत कोणत्याही पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे, पण म्हणून भाजपने देखील दोन हिंदुत्ववादी पक्षांची “पोलिटिकल स्पेस” खाऊन तिसर्‍याच मुस्लीम पक्षाला किंवा तथाकथित धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी पक्षाला “पोलिटिकल स्पेस” उपलब्ध करून देण्याचे कारण काय??, हा जाब देखील आज मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपला विचारलाच पाहिजे!!

– मोदी – बाळासाहेब

आज मोदींचे करिष्माई नेतृत्व भाजपकडे आहे. आधी शिवसेनेकडे बाळासाहेबांचे करिश्माई हे नेतृत्व होते. तेव्हा या दोन पक्षांमध्ये स्पर्धा नव्हती, असे नाही. “पोलिटिकल स्पेस”चा वाद नव्हता असेही नाही. पण दोन्ही पक्षांचे नेतृत्व पुरेसे प्रगल्भ होते. तो वाद घरातच कसा मिटेल म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांमध्ये कसा मिटेल, हे ते पाहत होते. पण सध्याचे सर्वच हिंदुत्ववादी पक्षांचे नेतृत्व अतिमहत्त्वाकांक्षेने एवढे पछाडले आहे, की ते आपापसात अतिटोकाचे भांडण करून मुस्लिम पक्षाला अथवा कथित राष्ट्रवादी पक्षाला “पोलिटिकल स्पेस” उपलब्ध करून देत आहेत. ही स्पेस उपलब्ध करून देताना सर्व हिंदुत्ववादी पक्षांची हानी होणार आहे. मग भले त्यात कमी जास्त प्रमाण असेल, पण हे त्यांना समजत नाही का??

– 70 वर्षानंतरची संधी

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी हिंदुत्ववादाला राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने निर्णायक महत्त्व आले आहे. देशाचे काही राजकीय निर्णय हिंदुत्ववादाच्या दिशेने होताना दिसत आहेत. अशा स्थितीत हिंदुत्ववाद्यांची “पोलिटिकल स्पेस” विस्तारण्यापेक्षा आपापसातील भांडणातून मुस्लिम पक्षाला आणि तथाकथित राष्ट्रवादी पक्षाला “पोलिटिकल स्पेस” मिळवून देण्यात काय मतलब आहे??, याचा जाब हिंदू मतदारांनी सर्व हिंदुत्ववादी पक्षांना विचारलाच पाहिजे. त्यातून ना मोदींचा करिष्माई नेतृत्वाखालचा भाजप सुटावा, ना शिवसेना अथवा मनसे सुटावेत!! कारण जनतेच्या मतांच्या बळावर या हिंदुत्ववादी पक्षांना मोठी “पोलिटिकल स्पेस” उपलब्ध झाली आहे.

– बिगर हिंदुत्ववादी पक्षांना “पोलिटिकल स्पेस”

एकेकाळी हीच जनता काँग्रेसच्या गारुडाखाली हिंदुत्ववादी पक्षांना दारात उभे करत नव्हती. पण आता काळ फिरला आहे तर त्याचा लाभ हिंदुत्ववादी पक्षांनी घेण्याची गरज असताना एकमेकांमध्ये जीवघेणे भांडून मुस्लिम पक्षाला अथवा तथाकथित राष्ट्रवादी पक्षाला “पोलिटिकल स्पेस” आंदण देण्याचे खरे काहीच कारण नाही. अकबरुद्दीन ओवैसीची सभा, त्यातले विषारी भाषण नेमका हाच “संदेश” हिंदुत्ववादी पक्षांना देत आहे!!3

Pro-Hindu parties are not the poisonous fruit of the quarrel, but what else to say

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात