प्रतिनिधी
संभाजीनगर : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन आणि नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरे यांच्यावर विषारी टीका हाच हैदराबादच्या एआयएमआयएमचे तेलंगणचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचा संभाजीनगर मधला दिवसभराचा कार्यक्रम होता. First visit to Aurangzeb’s tomb; Later, he called Raj Thackeray a “dog”
अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज संभाजीनगर मध्ये एआयएमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांच्या निमंत्रणावरुन काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण सर्वात आधी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन त्यावर चादर वाहिली. नंतर संभाजीनगर मधील मुस्लिम पर्यटनस्थळांना भेट दिली.
अल्हम्दुलिल्लाह नक़ीब ए मिल्लत एजुकेशनल कैंपस (ओवैसी स्कूल ऑफ़ एक्सीलेंस – औरंगाबाद) का संगे बुनियाद रखा गया pic.twitter.com/qSD109nlh6 — Akbaruddin Owaisi (@imAkbarOwaisi) May 12, 2022
अल्हम्दुलिल्लाह नक़ीब ए मिल्लत एजुकेशनल कैंपस (ओवैसी स्कूल ऑफ़ एक्सीलेंस – औरंगाबाद) का संगे बुनियाद रखा गया pic.twitter.com/qSD109nlh6
— Akbaruddin Owaisi (@imAkbarOwaisi) May 12, 2022
त्यानंतर मुस्लिमांच्या मेळाव्याला अकबरुद्दीन ओवैसी यांनी संबोधित केले. यावेळी अत्यंत विषारी भाषेत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला घरातून बाहेर काढले आहे. त्याला मी काय उत्तर द्यावे??, त्याची लायकी नाही. ते सध्या बेघर आहेत पण आमच्या पक्षाचा एक खासदार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुसलमानांनी आमच्या पक्षाला पाठिंबा देत खासदार – आमदार निवडून आणले आहेत. पण इथे कुत्री येऊन भुंकत राहतात. कुत्र्यांना काय भुंकायचे ते भुंकू द्या. परंतु सिंह त्याच्याकडे बघून हसतो, अशा विषारी शब्दांमध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता शरसंधान साधले.
– राज ठाकरेंवर कारवाई पण ओवैसींचे काय??
राज ठाकरे यांनी संभाजीनगर मध्ये सभा घेतल्यानंतर त्यांनी 12 पैकी 10 अटींचे उल्लंघन केले आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता अकबरुद्दीन ओवैसी यांनी अत्यंत विषारी भाषेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या ओवैसींवर आता महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार कोणती कायदेशीर कारवाई करणार?, असा सवाल आता सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more