NIA : अतुलचंद्र कुलकर्णींची एनआयएच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती!!; सुबोध जयस्वालांपाठोपाठ चौथे अधिकारी दिल्लीत!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्र कॅडरच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत असलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांना ताबडतोब महाराष्ट्र पोलीस सेवेतून मुक्त करून डेप्युटेशनवर एनआयए मध्ये पाठवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने काढले आहेत. अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्ती एक वर्षासाठी असेल. Appointment of Atul Chandra Kulkarni as Additional Director General of Police of NIA

मूळचे सोलापूरचे असलेले अतुलचंद्र कुलकर्णी कुलकर्णी हे १९९० आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात नांदेड येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या कुलकर्णी यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक (जळगाव) आणि पोलिस अधीक्षक (भंडारा) म्हणून काम केले आहे. नागपूर येथील नक्षलविरोधी मोहिमेतही त्यांचा मोठा सहभाग होता. मुंबईच्या सहपोलिस आयुक्त गुन्हे शाखेची आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी उत्कृष्टरित्या संभाळली आहे.

– जयस्वाल, शुक्ला, वानखेडे, कुलकर्णी

महाराष्ट्र कॅडरचे अनेक अधिकारी सध्या केंद्र सरकारच्या सेवेत डेप्युटेशनवर अर्थात प्रतिनियुक्तीवर आहेत. यामध्ये सुबोध जैस्वाल रश्मी शुक्ला, समीर वानखेडे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात आता अतुलचंद्र कुलकर्णी यांची देखील भर पडत आहे.

सुबोध जैस्वाल हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. सध्या ते राजधानी नवी दिल्लीत सीबीआयचे संचालक आहेत. रश्मी शुकला या 1988 च्या बॅंचच्या आयपीएस अधिकारी असून त्या केंद्रीय रिजर्व पुलिस फोर्स अर्थात सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक पदी हैदराबाद मध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत, तर समीर वानखेडे हे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मधले एक वर्षाचे आपले कामकाज आटोपून सध्या दिल्लीत रेव्हेन्यू इंटेलिजन्स मध्ये कार्यरत आहेत.

– मुंबई महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण केसेस

सध्या महाराष्ट्र आणि मुंबईत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय आणि राष्ट्रीय तपास संस्था एनआयए याच्याशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण केसेस केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच अतुलचन्द्र कुलकर्णी यांची केंद्र सरकारच्या सेवेत एनआयएच्या अतिरिक्त महासंचालक पदावर झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

Appointment of Atul Chandra Kulkarni as Additional Director General of Police of NIA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात