NIA Action : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून टेरर फंडिंग; डी कंपनीच्या दोघांना अटक!!


वृत्तसंस्था

मुंबई : एनआयए राष्ट्रीय तपास संस्थेने डी-कंपनी विरोधात सुरू केलेल्या कारवाईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक छोटा शकील याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरिफ अबुबकर शेख (वय ५९) आणि शब्बीर अबुबकर शेख (वय ५१) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. Terror funding from the western suburbs of Mumbai; D Company arrested two

हे दोघे मुंबईच्या पश्चिम उपनगरातून डी- कंपनीसाठी शकीलाच्या इशाऱ्यावरून बेकायदेशीर काम करत होते. इतकेच नाही तर मुंबईत बसून ते दोघे टेरर फंडिंग करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील एनआयएने केलेली ही पहिलीच अटक असून या दोघांना शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एनआयएच्या विशेष न्यायालयात हजेरी

पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे सिंडिकेट चालविणारा शकील शेख उर्फ छोटा शकील याच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. छोटा शकील याचा  खंडणी, ड्रग्सची तस्करी, हिंसक कृत्य, तसेच दहशतवादी कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.



 

अटक केलेले आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख हे दोघे शकीलच्या सांगण्यावरून डी-कंपनीसाठी काम करीत होते, या दोघांच्या अटकेमुळे छोटा शकीलला हादरा बसला असून या दोघांच्या संपर्कात असणाऱ्याना देखील लवकरच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी या दोघांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

Terror funding from the western suburbs of Mumbai; D Company arrested two

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात