विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाषणात व्यत्य आणत असलेल्या खासदारांना ही धमकाविण्याची भाषा योग्य नाही अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावले आहे. निर्मला सीतारामण या सभागृहात भाषण करत असताना विरोधी पक्षाचे खासदार त्यांच्या भाषणात व्यत्यय आणत होते. त्यांच्या सभोवताली गोळा झाले होते.The fashion of intimidation is not right, Nirmala Sitharaman told MPs in Parliament
राज्यसभेत सीतारामण यांनी दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक २०२१ सादर केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक मुद्दा मांडला आहे की संसदीय सौजन्य खूप महत्वाचे आहे. तुमच्यात मतभेद असू शकतात, तुम्ही निषेध करू शकता.
काही झालं तरी बोलणाºया सदस्यांमध्ये अडथळा निर्माण करणे आणि दबाब आणण्याच्या उद्देशाने त्याच्या सभोवताली जमा होणे तसेच त्याला धमाकवण्याची फॅशन पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
आर्थिक संकटातील बँकेच्या ठेवीदारांना सरकारने दिलासा दिला आहे. अडचणीतील बँकांमधील खातेदारांच्या ५ लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी ९० दिवसांत परत करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे, अशी माहितीही सीतारामन यांनी दिली.
मागील आर्थिक वर्षांत हेतुपुरस्सर कर्ज थकबाकीदार (विल्फुल डिफॉल्टर्स) संख्येने वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले. ३१ मार्च २०२१ अखेर त्यांची संख्या २,२०८ वरून २,४९४ इतकी वाढल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App