Women ministers HI tea diplomacy : निर्मला सीतारामन यांचे महिला मंत्र्यांना घरी चहापान


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – देशात प्रथमच एक दोन नव्हे, तर ११ महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ते सेलिब्रेट करण्यासाठी आणि या महिला मंत्र्यांशी हितगुज करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सगळ्या सगळ्या महिला मंत्र्यांना आपल्या घरी चहापानासाठी निमंत्रित केले होते. Union Finance Minister Nirmala Sitharaman hosted women members of the Union Council of Ministers, at high-tea at her residence today

या चहापानाला स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, डॉ. भारती पवार, शोभा करंदलजे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी, दर्शना विक्रम जरदोस, प्रतिमा भौमिक आदी महिला मंत्री उपस्थित होत्या.

निर्मला सीतारामन या मोदी मंत्रिमंडळातल्या सगळ्यात ज्येष्ठ महिला मंत्री आहेत. सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे हे ज्येष्ठत्व चालून आले आहे. मोदी सरकारमध्ये त्या संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री या दोन महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत.



नव्याने मंत्री झालेल्या महिला नेत्यांशी त्यांनी या चहापानाच्या निमित्ताने सरकारच्या कामकाजाविषयी चर्चा केली. त्यांना सरकारी कामकाजातल्या खाचाखोचा समजावून सांगितल्या.

येत्या १९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यात महिला मंत्र्यांचा परफॉर्मन्स दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर देखील महिला मंत्र्यांना निर्मला सीतारामन यांनी मार्गदर्शन केल्याचे मानले जात आहे.

एरवी एवढे १० – ११ मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या घरी एकत्र जमले असते, तर पंतप्रधानांविरोधात बंड, कॅबिनेटमध्ये मोठे मतभेद वगैरे बातम्या छापून आल्या असत्या. त्यांच्या ब्रेकिंग न्यूज झाल्या असत्या. पण मोदी कॅबिनेटमधल्या १० महिला एकत्र जमल्यानंतर तशी ब्रेकिंग न्यूज झाली नाही.

Union Finance Minister Nirmala Sitharaman hosted women members of the Union Council of Ministers, at high-tea at her residence today

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात